Bachhu Kadu Support Raju Shetti : 'या' कारणांसाठी बच्चू कडूंनी दिला राजू शेट्टींना पाठिंबा

Political News : सध्या इतर पक्षांकडुन धर्मा-धर्मात जातीच्या नावे विभागणी करायचे काम सुरु आहे. शेतकरी,शेतमजुर कष्टकऱ्यांना बाजुला ठेवुन जातीय धर्माचे राजकारण मजबुत करण्याचे षडयंत्र सुरु आहे. ते षडयंत्र तोडण्याची भूमिका आमची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Bachhu Kadu
Bachhu KaduSarkarnama

Karad News : आमचे पहिले नाते शेतकऱ्यांसोबत आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. त्यामुळे मी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देत आहे, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले.

सध्या इतर पक्षांकडुन धर्मा-धर्मात जातीच्या नावे विभागणी करायचे काम सुरु आहे. शेतकरी,शेतमजुर कष्टकऱ्यांना बाजुला ठेवुन जातीय धर्माचे राजकारण मजबुत करण्याचे षडयंत्र सुरु आहे. ते षडयंत्र तोडण्याची भूमिका आमची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी पुण्यावरुन आमदार कडू (Bacchu Kadu) हे कऱ्हाड ( जि. सातारा) येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे गौरव जाधव, मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानुदास डाईंगडे, पुण्याचे प्रमुख मंगेश धुमाळ, प्रविण शिंदे, रमेश भिसे, सांगली जिल्हाध्यक्ष सुनील सुतार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर, पिंपरी चिंचवडचे नंदकुमार जगदाळे, बेळगावचे शिवकुमार बोधले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बच्चू कडू म्हणाले, खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. धर्मातील धर्मात जातीच्या नावे विभागणी करायचे, शेतकरी, शेतमजूर कष्टकऱ्यांना बाजुला ठेवुन जातीय धर्माचे राजकारण मजबुत करण्याचे षडयंत्र इतर पक्षांकडुन सुरु आहे. त्याला तोडण्याची आमची भूमिका आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्यांदा शेतकरी म्हणून जगले पाहिजे

राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. ते शेतकरी चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमचे पहिले नाते शेतकऱ्यांसोबत आहे मग जात धर्म येवु शकतात. पहिल्यांदा शेतकरी म्हणून जगले पाहिजे, शेतकरी म्हणून मतदान केले पाहिजे, शेतकरी म्हणून उभे राहिले पाहिजे हे भूमिका आमची ठाम आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com