Bagawat Karad : सरकारच्या योजना कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत न्याव्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भाजपच्या वतीने आयोजित सेवा पंधरवाडा अभियान समारोप प्रसंगी शेवगाव येथे झाला.
Bagawat Karad, BJP
Bagawat Karad, BJPSarkarnama
Published on
Updated on

Bagawat Karad : भाजपला अहमदनगर जिल्ह्यात पोषक वातावरण असल्याने आपले इकडे विशेष लक्ष आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या आर्थिक सुबतत्तेसाठी प्रयत्न करू. शेतकरी व सर्वसामान्य कुटूंबासाठी असलेल्या सरकारच्या योजना कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत न्यायला हव्यात. नीती, नियत आणि इरादा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणीवर पक्षाची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Dr. Bagawat Karad ) यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भाजपच्या वतीने आयोजित सेवा पंधरवाडा अभियान समारोप प्रसंगी शेवगाव येथील कार्यक्रमामध्ये डॉ.कराड बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, बापू घडामोडे, दीपक बडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला तालुकाध्यक्ष आशा गरड, शहराध्यक्ष उषा कंगणकर, मुख्याधिकारी संतोष लांडगे, बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले, अभय आव्हाड, सागर फडके, महेश फलके, दिनेश लव्हाट, भिमराज सागडे, कचरु चोथे, तुषार वैदय, उमेश भालसिंग, गणेश कराड, विजय कापरे आदी प्रमुख उपस्थित होते.

Bagawat Karad, BJP
महाविकास आघाडी गेली तरच महाराष्ट्राचा विकास : भागवत कराड

यावेळी डॉ.कराड म्हणाले की, केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य मिळत आहे. तर ठराविक लोकांसाठी यापूर्वी असलेल्या राष्ट्रीयीकृत बँका आता सर्वसामान्य नागरिकांसाठी झालेल्या असून 46 कोटी 70 लाख जनधन खातेदार लाभ घेत आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेतून 11 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जात आहे. तर लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर पैसा जमा होत असल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत नाही. त्याकरीता आधार व मोबाईल क्रमांक खात्याला जोडलेला आहे. या मतदार संघात राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे निर्माण करुन नाबार्ड अंतर्गत येणाऱ्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Bagawat Karad, BJP
Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

याप्रसंगी खासदार विखे यांनी राष्ट्रीयीकृत बँकांमधील बंद असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जाविषयी लक्ष वेधले. तर आमदार मोनिका राजळे यांनी मतदार संघातील रस्ते, बँकींग सुविधा यासाठी झुकते माप देण्याची मागणी केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन, नगरपरीषदेच्या कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपन,स्वच्छता अभियान तर भोईराज मंडळाच्या नवरात्रोत्सवात डॉ. कराड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले. राजू सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. वाय. डी. कोल्हे यांनी आभार मानले.

Bagawat Karad, BJP
Karad : स्वच्छ सर्वेक्षणात कराड पालिका देशात अव्वल; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

केंद्रीय मंत्री असलेल्या डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थित शेवगाव शहरात प्रथमच जाहीर कार्यक्रम होत असतांना व त्यास खासदार विखे, आमदार राजळे हे दोन्ही लोकप्रतिनिधी व पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुंढे उपस्थित असतांना कार्यक्रमस्थळी निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. तर कार्यक्रमासाठी ओढून ताणून आणलेल्या नगरपरीषदेच्या महिला कर्मचारी देखील अर्ध्यातूनच उठून गेल्याने पक्षाचा कार्यक्रम अधिकच उघडा पडल्याची चर्चा शहरात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com