बाळा नांदगावकरांनी संजय राऊतांवर केली उपरोधिक टीका, म्हणाले...

मनसेचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी राज्यातील विविध ठिकाणी पक्षाचे मेळावे घेत आहेत.
 Bala Nandgaonkar,Sanjay Raut
Bala Nandgaonkar,Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) पक्षाचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी राज्यातील विविध ठिकाणी पक्षाचे मेळावे घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या हालचालींना वेग आणला आहे. त्यानुसार आज अहमदनगर येथे आले असता त्यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ( Bala Nandgaonkar made sarcastic remarks on Sanjay Raut, said ... )

अहमदनगरमधील मनसेच्या मेळाव्या बाबत ते म्हणाले, मला बऱ्याच दिवसांपासून अहमदनगरला यायचे होते. कारण अहमदनगर व माझे जीवाभावाचे नाते आहे. कार्यकर्त्यांना भेटण्याची मला फार इच्छा होती. त्यामुळे भेटण्यासाठी मी मुद्दाम आलो. मोठ्या पक्षात कार्यकर्त्यांत कुरघुल्या असतात, मतभेद असतो. सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन जात असताना अडीअडचणी असतात. लोकशाहीत निवडणुका सुरू असतातच मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील हा मेळावा आहे असे म्हणता येणार नाही.

 Bala Nandgaonkar,Sanjay Raut
बाळा नांदगावकर म्हणाले, पक्ष शिस्त व विश्वासार्हतेत तडजोड नाही...

राज्यातील नेत्यांवर ईडी व इतर खात्यांकडून कारवाया सुरू असल्या बाबत विचारले असता बाळा नांदगावकर म्हणाले, मला वाटते की कायद्या समोर सर्व समान आहेत. राज ठाकरे यांनाही ईडीची नोटीस आली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे कायद्या समोर सर्वजण समान आहेत. ज्याला नोटीस येती त्याला आपली बाजू मांडण्यासाठी ईडी समोर जावं लागतं. आपली बाजू मांडावी लागते मात्र एकंदर जनमाणसाचा कानोसा घेतला तर लोकांना वाटते की हे जे सुरू आहे ते काही बरोबर नाही. या पूर्वीचे राजकारण कधी एवढ्या खालच्या पातळीवर आले नव्हते. खालच्या पातळीवर गेलेलं व एकमेकांच्या घरापर्यंत जाणारं राजकारण मी महाराष्ट्रात कधी या पूर्वी पाहिले नव्हते. कारण प्रत्येकाचे घर काचेचे आहे. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.

 Bala Nandgaonkar,Sanjay Raut
Video: स्वतंत्र लढण्याची तयारी असायला हवी - राज ठाकरे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांविषयी विचारले असता नांदगावकर यांनी मिश्कीलपणे सांगितले की, संजय राऊत खुप मोठे आहेत. त्यांनी एवढ्या निवडणुका लढविल्या आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे. आम्ही थोडी निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही. माझे नेते राज ठाकरे यांनी कालच त्यांना सल्ला दिला आहे, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com