Dhairyashil Kadam Vs Balasaheb Patil : बाळासाहेब पाटील शरद पवार की अजित पवारांकडे ; धैर्यशील कदमांचा सवाल

Dhairyashil Kadam on Balasaheb Patil :
Balasaheb Patil
Balasaheb PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara News : भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्षपदी खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील युवा नेते धैर्यशील कदम यांची नियुक्ती झाली. सातारा जिल्हा अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच. कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली आहे. "बाळासाहेब पाटील नेमकं अजित पवार यांच्याकडे आहेत की ? शरद पवार यांच्याकडे आहेत ? हे त्यांनी स्पष्ट करावं,"असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.

Balasaheb Patil
Balasaheb Thorat : अजितदादांच्या 'निधी' चे प्रकरण घेऊन बाळासाहेब थोरात न्यायालयाच्या दारात ?

अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर येताच पहिल्या दिवशी धैर्यशील कदम यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले. तसेच कदम यांनी कराड शहरातून रॅली देखील काढली. यावेळी प्रदेश भाजपचे सचिव विक्रम पावसकर,भरत पाटील, मनोज घोरपडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाकामांच्या आणलेल्या निधीवरून श्रेयवाद सुरू आहे. दोन्ही गटाचे नेते आमने - सामने येत हा निधी आपणच आणला असल्याचा दावा करत आहेत. परंतु "भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निधी आणला आहे. या निधीमुळे कराड उत्तर मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे," धैर्यशील कदम यांनी सांगितले.

Balasaheb Patil
Monsoon Session 2023 : आम्हाला काहीच नाही, अन् अजित पवारांच्या आमदारांना ५० कोटी, सर्व पुरावे आहेत, पण…

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आता भाजपचे कमळ चांगले फुलू लागलेले आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळत आहे. कराड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या गळ्यात सध्या भाजप सातारा जिल्हाध्यक्षपदाची टाकल्याने सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. "धैर्यशील कदम यांनी भाजपची ध्येय धोरणे आणि विकास कामे तळागाळातील लोकांपर्यत पोहचवण्यासाठी मी दिवसरात्र फिरणार असल्याचेही, बोलतांना सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com