
Karad, 06 April : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निर्णायक विजयाकडे वाटचाल करीत असलेले माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. या विजयानंतर बाळासाहेब पाटील यांची सह्याद्री कारखान्यावर सलग सहाव्यांदा सत्ता राहणार आहे. या विजयी वाटचालीनंतर माध्यमांशी बोलताना ‘आमच्यावर समोरच्यांनी पातळी सोडून आरोप केले, तरीही आम्ही संयम ठेवला, आमच्यावर (स्व.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत,’ असा टोला पाटील यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला.
कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीची (Sahyadri Sugar Factory elections) आज रविवारी मतमोजणी झाली. या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूच बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलला मतदारांनी कौल दिल्याचे दिसून आले. पुढे दिवसभरात आघाडीत वाढ होत गेली आणि पाटील यांच्या पॅनेलने सह्याद्री कारखान्यावर निर्वीवाद वर्चस्व कायम राखत विरोधी पॅनेलच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला.
पहिल्या फेरीच्या निकालानंतर बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) हे मतमोजणी केंद्रावर आले होते. तेथे त्यांनी कार्यकर्ते, निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पहिल्या फेरीअखेरच पी. डी. पाटील पॅनेलचे सर्वच उमेदवार हे सरासरी चार हजार मतांनी आघाडीवर होते.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला आणि त्यांच्या विचाराच्या पी. डी. पाटील पॅनेलला सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चांगले मतदान झाले. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत आमच्या पॅनेलने सुमारे ४२०० चे मताधिक्य घेतले होते. दुसऱ्या फेरीतही मताधिक्य मिळत गेले.
कारखान्याचे सभासद, शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आमच्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, त्यामुळे समोरच्या बाजूने पातळी सोडूनही आरोप होत असताना आम्ही संयम ठेवला, तो आम्ही ढळू दिला नाही, असेही बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
गट क्रमांक एक कराड : पहिल्या फेरीत मतदान केंद्र क्रमांक एक ते पन्नास यामध्ये उमेदवारनिहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे
संजय किसन चव्हाण 3848,
राजेंद्र बाळासाहेब माने 3786
अण्णासाहेब रामराव पाटील : 8114
संदीप यशवंत पाटील 910
श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 7854
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.