काँग्रेस टिकविणारं संगमनेर मॉडेल बाळासाहेब थोरातांनी समजावून सांगितलं...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचा संगमनेर मतदार संघ आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - संगमनेर हा काँग्रेस बालेकिल्ला समजला जातो. 1962 पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचा संगमनेर मतदार संघ आहे. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe ) यांची आई दुर्गा तांबे ( Durga Tambe ) याच शहरात नगराध्यक्षा आहेत. सत्यजित तांबे यांचा युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी युवक काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय स्नेहमेळावा व अभ्यास शिबिर संगमनेरला घेतले. ( Balasaheb Thorat explained the Sangamner model that will sustain the Congress ... )

या शिबिरात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते सांगितले की, समृद्ध परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षात युवकांना मोठी संधी आहे. प्रत्येक पक्षाला कधीतरी संकटातून जावे लागते, मात्र संकटात लढणारा खरा सैनिक असतो. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे राज्यभर मोठे संघटन उभे राहिले आहे. राज्यातील युवकांमध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केल्यामुळे नक्कीच युवक काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले.

Satyajeet Tambe
Video: अर्थसंकल्प म्हणजे गुलाबी स्वप्नच; प्रत्यक्षात काही नाही; बाळासाहेब थोरात

सत्यजित तांबे म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांचे राजकारण व समाजकारण गोरगरीब माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. निवडणुकीपुरते राजकारण करणे योग्य नाही, जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे ध्येय ठेवून प्रत्येकाने काम करावे. आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तळागाळापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून काँग्रेसचा विचार पोहोचविण्यात यश मिळाले. ग्रामीण विकास साधणारे संगमनेरचे सहकाराचे मॉडेल राबविण्यासाठी शक्य तेवढी मदत करू असे ते म्हणाले.

Satyajeet Tambe
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, शेतकी संघ, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, शाम्प्रो, अमृतवाहिनी बँक, अद्ययावत बस स्थानक, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय तसेच बाळासाहेब थोरात यांचे 24 तास कार्यरत असणारे यशोधन संपर्क कार्यालय आदी संस्थांना भेटी दिल्या. आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com