Balasaheb Thorat News : सत्यजीत तांबेंचे अभिनंदन करत थोरातांनी मौन सोडले; काय करायचे ते पक्षीय पातळीवर करणार

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांनी एक महिन्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat News Sarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat News : संगमनेरचे राजकारण अधिक चांगले आहे. एक महिन्याच्या काळात खुप राजकारण झाले आहे. सत्ता बदलानंतर, अनेक कार्यकर्त्यांना अडचणीत आणले जात आहेत. विकासाची कामे चालली आहेत ती बंद पाडण्याचे काम चालू असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

संघार्षातून आपण बाहेर येवू, आणि उभे राहू, सत्यजीत तांबे यांचा विजय झाला. त्यांचे अभिनंदन, जे राजकारण झाले ते व्यथीत करणारे आहे. काय राजकारण झाले ते पक्ष नेतृत्वाला कळवले आहे. काँग्रेसचा (Congress) विचार हा आपला आहे. अनेक बातम्या, अशा आल्या, की आपल्याला भाजपमध्ये (BJP) नेऊन ठेवले. पुढील वाटचालही काँग्रेस विचारानेच असणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat News
Kasba by-election : कसब्यात इतिहासाची पुनरावृत्ती करायचीच : काँग्रेसने बांधला चंग; पटोलेंचा पुण्यात तळ

माझ्या मनातल्या भावाना मी बोललो आहे. पुढील काळात माझे आशिर्वाद आपल्या सोबत आहेत. असे, बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. नाशिक पदवीधर मतदार संघात झालेल्या राजकारणावर एक महिन्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Balasaheb Thorat News
Eknath Shinde News : आमदार गायकवाडांनी केला करेक्ट कार्यक्रम; शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का

नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला होता. या सर्व प्रकरणावर शनिवारी सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करत, आमच्या कुटुंबाविषयी आणि थोरात यांच्या विषयी शडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. त्यावर आज थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com