Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांमुळेच नगरमधून काँग्रेस हद्दपार; शिंदे गटातील 'या' नेत्याचा गंभीर आरोप

Rajendra Waghmare : नाना पटोले सर्वसामान्य व्यक्ती आहे. ते साखर सम्राट नाहीत. त्यांची पाण्याची, दारूची कंपनी नाही. ते सम्राट नाहीत आणि प्रदेशाध्यक्ष झाले, याचाच राग नेत्यांना आला आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress News : नगरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात सोडले काँग्रेसचा एकही मोठा नेता दिसत नाही. थोरातांमुळेच नगर जिल्ह्यातील Ahmednagar काँग्रेस हद्दपार झाल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते आणि पुर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते राजेंद्र वाघमारेंनी केला आहे. निवडून येणाच्या क्षमता असूनही थोरांतांनी माझे तिकीट कापल्याचा आरोपही वाघमारेंनी केला आहे. ते कोत्या मनाचे असल्यानेच काँग्रेसचे अनेक निष्ठावंत पक्षातून बाहेर पडले, याकडेही वाघमारेंनी लक्ष वेधले. वाघमारेंच्या या आरोपांनी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजू वाघमारे Rajendra Waghmare म्हणाले, नगरमधील काँग्रेसच्या पडझडीला दिल्ली जाबाबदार नाही नगर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्यास जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व जबाबदार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कोत्या मनोवृत्तीमुळे, मी आणि आमच्यासारखे निष्ठावंत बाहेर पडले आहेत. नगर जिल्ह्यातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचा गंभीर आरोप राजेंद्र वाघमारेंनी केला आहे.

काँग्रेसमधील कलह प्रस्थापितांमुळे वाढला. मी पक्षाशी ३५ वर्षे एकनिष्ठ होतो. बाळासाहेब थोरातांना Balasaheb Thorat पहिली अपक्ष निवडणूक लढविण्यास आरपीआयने सपोर्ट केला होता. आमचे व्यक्तिगत संबंध चांगले होते. मात्र जिथे ते चुकीचे वागले तिथे बोलणारच असे सांगून वाघमारेंनी थोरातांचा कडक शब्दांत समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाघमारे म्हणाले, 2019 ला मी शिर्डीसाठी Shirdi इच्छुक होतो. सर्व्हेतही माझे नाव पुढे होते, मात्र थोरातांनी तिकीट भाऊसाहेब कांबळे यांना दिले. यावेळचीही काँग्रेसची शिर्डी जागेची तिकीट थोरातांनी ठाकरे गटाला गिफ्ट करून टाकली. काँग्रेस पक्ष बौद्ध समाजाशी जसा वागतोय त्यामुळे काँग्रेसला मतदान करू नका. जी काँग्रेस आपल्या समाजाला मानत नाही त्या काँग्रेसला मत देण्यात काही अर्थ नाही. त्यांनी समाजाचा विश्वासघात केला आहे, अशीही टीका वाघमारेंनी केली आहे.

Balasaheb Thorat
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा राऊतांवर कंट्रोलच राहिला नाही; शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं कारण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांना पक्षांतर्गत मोठा विरोध आहे. तो काही कमी होताना दिसत नाही. त्याचे कारण सांगताना वाघमारे म्हणाले, नाना पटोले सर्वसामान्य व्यक्ती आहे. ते साखर सम्राट नाहीत. त्यांची पाण्याची, दारूची कंपनी नाही. ते सम्राट नाहीत आणि प्रदेशाध्यक्ष झाले, याचाच राग नेत्यांना आला आहे. नाना पटोले यांच्यामुळे पक्षातील कलह वाढलेला नाही, तो इतर लोकांमुळे वाढला आहे, यावरही वाघमारेंनी बोट ठेवले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe patil : 'उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलं...', राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com