बाळासाहेब थोरात म्हणाले, विरोधकांचा छळ करणे हे भाजपचे धोरण...

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. या प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. ( Balasaheb Thorat said, BJP's policy is to persecute the opposition ... )

दिल्लीत आज अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांना कारवाईची नोटीस दिली. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. हा वापर राजकीय कारणासाठी सुरू आहे. त्यातून विरोधकांना नामोहरण करण्याच प्रयत्न होत आहे. यातून नामोहरण तर सोडाच जनता आमच्या पाठिशी उभी राहिल आणि भाजपला त्यांची जागा दाखवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू...

ते पुढे म्हणाले की, जे काही केंद्र सरकारकडून सुरू आहे ते जनता जाणते आहे. यातून भाजपच्या विरोधात मोठा असंतोष जनतेत झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांना दबावात ठेवणे, अस्वस्थ ठेवणे, छळ करणे हे भाजपचे धोरण आहे. हे त्यांच्या हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. या संदर्भातील काँग्रेसची भूमिका लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
रोहित पवारांचे पडळकरांना सडेतोड उत्तर : म्हणाले...

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस मिळाली हा तर लोकशाहीवरील आघात आहे. लोकशाही पुढे चालेल की नाही असे आता वाटू लागले आहे. हुकूमशाही येऊ लागली आहे, असे मला वाटते. हे भारतीय जनता मान्य करणार नाही. महाराष्ट्र व दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांविरोधात भाजप ईडी मार्फत कारवाई करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com