बाळासाहेब थोरात म्हणाले, शिर्डीत काँग्रेस पक्ष आहे हे तर सर्वांना कळाले ना?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) काल ( शनिवारी ) शिर्डीत गेले होते. या प्रसंगी त्यांनी काँग्रेसच्या तेथील परिस्थितीवर मिश्किल भाष्य केले.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - शिर्डी व परिसर हा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. विखे भाजपमध्ये गेल्यामुळे या परिसरातील काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) काल ( शनिवारी ) शिर्डीत गेले होते. या प्रसंगी त्यांनी काँग्रेसच्या तेथील परिस्थितीवर मिश्किल भाष्य केले. ( Balasaheb Thorat said, did everyone know that there is a Congress party in Shirdi? )

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्वागतासाठी काँग्रेस पक्षाच्या दोन शहराध्यक्षांनी एकाच वेळी फलक लावले. त्यातील पूर्वीचे शहराध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर नगरसेवक सचिन चौगुले काल त्यांच्या गाडीत होते. दुसरे नवनियुक्त शहराध्यक्ष अशोक कोते त्यांच्या स्वागताला पुष्पगुच्छ घेऊन हजर होते.

Balasaheb Thorat
काँग्रेसमधील गटबाजी वेळीच आवरा : बाळासाहेब थोरात;पाहा व्हिडिओ

यावर भाष्य करताना थोरात म्हणाले, की शहराध्यक्षपदावरून काँग्रेस पक्षात सध्या जी गडबड सुरू आहे, त्यामुळे येथे काँग्रेस पक्ष आहे हे तर सर्वांना माहिती झाले. त्यांच्या या मिस्कील टिप्पणीमुळे या गडबडीत आज आणखी भर पडली.

शिर्डी नगरपंचायतीत थोरात यांचे प्रतिस्पर्धी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे मर्यादित अस्तित्व आहे. तुलनेत काँग्रेसची शक्ती फारच कमी आहे. मात्र, सध्या याच काँग्रेस पक्षाच्या सहा बंडखोर नगरसेवकांनी शहराच्या राजकीय पटलावर धमाल उडवून दिली. शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावरील हरकतींवर सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल गेला, की नगरपरिषदेची घोषणा अपेक्षित आहे.

Balasaheb Thorat
Video: वाळू स्वस्तात उपलब्ध होणार- बाळासाहेब थोरात

नगरपरिषद व्हावी यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला. मात्र, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यासह एकूण सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करून नगरसेवकपद बिनविरोध पदरात पाडून घेतले. त्यातून या सहा जणांवर काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी कारवाई केली. त्यामुळे काँग्रेस गेल्या महिनाभरापासून चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या गडबडीमुळे शिर्डीत काँग्रेस पक्ष आहे, हे सर्वांना माहिती तर झाले, अशी मिस्कील टिप्पणी थोरातांनी केली.

Balasaheb Thorat
दुर्गा तांबे म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये चांगले काम होतय...

काँग्रेस पक्षाच्या सहा बंडखोर नगरसेवकांना हारतुरे देऊन स्वागत व सत्कार केला जात आहे. त्यांनी कामकाजाला सुरवात केली आहे. माझी वसुंधरा अभियान प्रकल्पप्रमुख व नगरविकास मंत्रालयाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांचा येथे पाहणी दौरा झाला. यावेळी या नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी फेरीवाल्यांना ओळखपत्रे देण्याबाबत सभागृहात मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्यासमवेत बैठक घेतली. आज रस्ते स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. या प्रत्येक कार्यक्रमाचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत. बहिष्कारासाठी आटापिटा करणारे प्रभावशाली स्थानिक नेते मात्र आपापले आमदार व मंत्री यांच्याकडे, नगरपरिषद लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात मग्न आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com