बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यघटना मोडित काढण्याचे काम सुरू...

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - श्रीरामपूर येथील एका सामाजिक कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. ( Balasaheb Thorat said, work is underway to break the constitution ... )

दत्तनगर येथे आयोजित सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीताचा कार्यक्रमाच्या प्रारंभ प्रसंगी मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, करण ससाणे, सचिन गुजर, बाबा दिघे, प्रेमचंद कुंकूलोळ, सुनील शिरसाठ, संजय छल्लारे, सुधीर नवले आदी उपस्थित होते.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाईवरुन लक्ष वळविण्यासाठी हनुमान चालिसाचा वाद

बाळासाहेब थोरात म्हणाले, की देशात कशा पद्धतीने राजकारण चालले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश, राज्यघटना मोडित काढण्याचे काम काही मंडळीकडून देशभरात सुरू आहे. माणसापासून माणूस दूर करायचे, जातीपासून जात, धर्मापासून धर्म दूर करायचे, भांडणे, वाद लावायचे आणि त्याच्यावर मतांची पोळी भाजायची असा जो कार्यक्रम संपूर्ण देशांमध्ये चाललेला दिसतो, हे कोण करतं हे ओळखण्याची जबाबदारी आता प्रत्येकाची असल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाव न घेता केली.

मंत्री थोरात पुढे म्हणाले, पहिली क्रांती गौतम बुद्धांनी केली. तेव्हापासून ज्या ठिकाणी चुकीचे चालले, अन्यायकारक चालले त्याविरुद्ध लढा देण्याची जी परंपरा सुरू झाली त्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत गोरोबा कुंभार अशा अनेक जाती धर्माचे संतही अपवाद ठरले नाही. सर्व संतांनी समतेचा संदेश दिला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीने देशाला स्वातंत्र्य मिळाले. आणि त्यानंतर महत्वाचा निर्णय घेतला राज्यघटना समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. संपूर्ण देशातील अनेक जाती, धर्म, परंपरा, संतांनी मांडलेलं तत्त्वज्ञान हे एका माळेमध्ये आणण्याचे काम राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी केले.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप व एमआयएम आमच्यासाठी सारखेच...

राज्यघटनेने आपल्या जीवनात जे काही बदल केले, मानसन्मान दिला, गरिबांच्या झोपडीपर्यंत मोठ्या माणसांना नेण्याचे काम घटनेमुळे झाले. काळ बदलत असताना आपल्या सर्वांना दिसतोय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश, राज्यघटना कुठेतरी मोडीत काढण्याचे काम काही मंडळी करत आहेत. हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचे तुम्ही-आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ही राज्यघटना प्राणपणाने जपण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com