अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून राजन पाटलांना त्रास; बळीराम साठे थेटच बोलले

गेल्या 30 वर्षापासून माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी तालुका एकसंघ ठेवण्याचे काम केले.
Baliram Sathe
Baliram Sathesarkarnama

मोहोळ : गेल्या 30 वर्षापासून माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी तालुका एकसंघ ठेवण्याचे काम केले. मात्र, त्याला आता डाग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही गोष्टी बोलल्या नाही पाहिजे मात्र, बोलण्याची वेळ आली आहे. ज्या श्रेष्ठीच्या मार्गदर्शना खाली आम्ही काम करतो त्यांचेही याकडे लक्ष नाही. गेल्या 40 वर्षापासून आम्ही निष्ठेने काम करतो त्यात आमचा कुठलाही स्वार्थ नाही, असे असताना एखाद्या "तुटक्याला" जर रसद मिळत असेल तर ते बरोबर होणार नाही. याचा वेळीच विचार करावा असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (NCP) बळीराम साठे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांचे नाव न घेता दिला.

अनगर ता. मोहोळ येथे एक ऑगस्ट रोजी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष साठे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माढयाचे आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, सज्जन पाटील, नाना डोंगरे, जालिंदर लांडे, हनुमंत पोटरे, अरुण गोडसे, भारत सुतकर, शिवाजी चव्हाण, माऊली चव्हाण, शौकत तलफदार, रत्नमाला पोतदार, सिंधु वाघमारे, जोस्ना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Baliram Sathe
संजय राऊतांच्या अटकेविरोधात अनिल देसाईंनी लढवला किल्ला; सभागृह केले ठप्प

साठे पुढे म्हणाले, राजन पाटील यांच्यावर तालुक्यात खालच्या पातळीवर टीका होत आहे, त्याला कारण काय तर राजकारण. राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवर जायचे नसते. उमेश पाटील यांच्या डोक्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (Ajit Pawar) हात आहे. पक्षश्रेष्ठीनी वेळीच लक्ष न दिल्यास यातून काहीतरी वेगळे घडेल त्याला पर्याय नसल्याचे सांगीतले. एवढे सगळे होत असताना पक्ष सोडुन जाण्याचा विचार मनात येतो, तो का येऊ नये, असेही ते म्हणाले.

Baliram Sathe
आदित्य ठाकरेंचे भाषण एकनाथ शिंदे तानाजी सावंतांच्या घरात बसून ऐकणार!

श्रेष्ठींनी वेळीच सावध व्हावे. सहकारा शिवाय सध्या पर्याय नाही. विविध कार्यकारी सोसायटी यांना दैवत मानले पाहिजे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकऱ्यांना मदत करणारी एकमेव सोसायटी आहे. ती एकसंघ ठेवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. मोहोळ तालुक्यानंतर आता टिकेचे लोन आमच्या उत्तर सोलापूर (Solapur) तालुक्यात आले असल्याचे साठे यांनी सांगीतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com