बंडातात्यांना दंडुका आंदोलन भोवले; दोन गुन्हे दाखल

बंडातात्यांनी Bandatatya Karadkar शब्दांना धारेचे रूप देत वार केलेला आहे. कोणताही वारकरी असे करू शकत नाही. संपूर्ण वारकरी सांप्रदयांनी बंडातात्यांना या सांप्रदायातून बाहेर काढावे.
Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkarsarkarnama
Published on
Updated on

सातारा : राष्ट्रवादीसह भाजपच्या महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने आज सातारा शहर पोलिस ठाण्यात हभप बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी बंडातात्यांवर काल रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे बंडातात्यांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काल साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यसन मुक्त युवक संघटनेच्यावतीने दंडवत, दंडुका आंदोलन केले होते. यावेळी बंडातात्यांनी आंदोलनात सहभागी होत वाईन विक्रीच्या निर्णयावरून राजकिय पक्षांच्या महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर बंडातात्यांनी चुकन बोललो, असे सांगत माफी मागतो, असेही सांगितले होते.

Bandatatya Karadkar
राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल

तसेच महिला आयोगाने याची दखल घेत बंडातात्यांना नोटीस पाठवली आहे. आज सकाळी बंडातात्या यांना महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल फलटण पोलिसांनी पिंप्रद येथील गोशाळेतून ताब्यात घेतले. तर आता सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंडातात्या कराडकरांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी सरचिटणीस संगीता साळुंखे, सातारा जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, सीमा जाधव, अनघा कारखानीस आदी उपस्थित होत्या.

Bandatatya Karadkar
Video: समाजाचा प्रक्षोभ होईल, वाईनविक्रीचा निर्णय मागे घ्या; बंडातात्या कराडकर

संगीता साळुंखे म्हणाल्या, वारकारी सांप्रदाय हा वाखाणण्यासारखा आहे. त्यांचा आम्ही आदर करतो. परंतु या सांप्रदयात अशा काही व्यक्ती आहेत, ज्या समाजात आराजकता माजवत आहेत. खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबद्दलची आक्षेपार्य वक्तव्ये निषेधार्य आहेत. बंडातात्या हे वारकरी सांप्रदायात येऊन ते षडरिपूग्रस्त झाले आहेत. संत तुकाराम त्यांना किती समजलेत हा प्रश्न असून त्यांनी शब्दांना रत्नांची उपमा दिली.

Bandatatya Karadkar
शालेय पोषण आहारात आणि मंदिरातही वाईन उपलब्ध करून द्या : बंडातात्या कराडकर

मात्र, बंडातात्यांनी शब्दांना धारेचे रूप देत वार केलेला आहे. कोणताही वारकरी असे करू शकत नाही. संपूर्ण वारकरी सांप्रदयांनी बंडातात्यांना या सांप्रदायातून बाहेर काढावे. बंडातात्या रूक्मिणीदेवीच्या मंदीरात प्रवेश ते करत असतील. तर त्यांनी हे वक्तव्य करून त्यांनी रूक्मिणीदेवींचा अपमान केलेला आहे. समिंद्रा जाधव म्हणाल्या, बंडातात्यांचा हा राजकिय स्टंट असून कोण काय करते याचा पुरावे, गोळा करण्याचे काम ते करत आहेत. आम्हाला वारकरी सांप्रदायाचे मन दुखवायचे नाही. पण, आमचा रोख हा बंडातात्यांविषयीच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com