Chandrakant Patil News : 'Who is Who Is Dhangekar' चंद्रकांतदादांची पाठ सोडेना; आता कोल्हापुरातही बॅनर

Ravindra Dhangekar News : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
Chandrakant Patil, Ravindra Dhangekar
Chandrakant Patil, Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात काँग्रेसने विजय खेचून आणला आहे. यावरुन भाजप नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होत आहे.

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या (BJP) हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात त्यांनी 'Who Is Dhangekar' असा सवाल करत महाविकास आघाडीला आणि धंगेकर यांना डिवचले होते. त्यामुळे आता हाच धागा पकडून पुण्यामध्ये This is Dhangekar बॅनर लागले होते.

Chandrakant Patil, Ravindra Dhangekar
Bacchu Kadu Vs Shivsena 'गद्दारी'वरून बच्चू कडू आक्रमक : ‘हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे...’

त्यानंतर हे बॅनर आता कोल्हापुरातही लावण्यात आले आहेत. कोल्हापुरातही बॅनरबाजी करत महाविकास आघाडीने पाटील यांना डिवचले आहे. शहरातील कावळा नाका चौक परिसरात 'This is Dhangekar' म्हणत बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचारसभेत चंद्रकांत पाटील यांनी केलेला उल्लेख अजूनही त्यांनी पाठ सोडेना अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Chandrakant Patil, Ravindra Dhangekar
Gadkari : गडकरींविरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर, आरोपीवर गुन्हा दाखल !

भाजपने कसब्यातून धंगेकरांना पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. अनेक मोठ्या नेत्यांचे रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा आयोजित केल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुण्यात तळ ठोकला होता. चंद्रकांत पाटील यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यानंतर धंगेकर यांच्या संदर्भात सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com