Baramati Lok Sabha News: सुळेंचे प्रचारप्रमुख अजितदादांच्या गटात, सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला केली सुरुवात

Pravin Mane Join Ajit Pawars NCP: सुप्रिया सुळेंचे प्रचार प्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं.
Ajit Pawar, Pravin mane, Supriya Sule
Ajit Pawar, Pravin mane, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Baramati Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाकडे राज्यासह देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीने दोघांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात दररोज नवीन हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.

अशातच आता आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सुळेंचे प्रचार प्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने (Praveen Mane) यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवाय आपण अजित पवारांना पाठिंबा का दिला? याबाबतची सविस्तर माहिती माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Baramati Lok Sabha Constituency)

पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलताना माने म्हणाले, माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत राहिलं आहे. राज्यात अनेक बदल झालेत. अजित पवारांचे हात बळकट करुन त्यांची ताकद वाढवण्यासाठी इंदापूर (Indapur) तालुक्याच्या विकासासाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आजित पवारांसोबत (Ajit Pawar) आहोत.

तसेच राज्याच्या विकासासाठी अजित पवार हे भाजपसोबत (BJP) गेले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून आजपासून आम्ही प्रचाराला सुरूवात करणार असल्याचंही माने यावेळी म्हणाले. त्यानुसार त्यांनी आजपासून प्रचाराला सुरुवातदेखील केल्याच पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar, Pravin mane, Supriya Sule
Lok Sabha Election 2024: पूर्वी आमच्या वाड्यात तुताऱ्या वाजायच्या..., चिन्हावरून उदयनराजेंनी पवारांना ललकारलं

ते पुढे म्हणाले, 8 दिवसांपूर्वी लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उमेदवारी जाहीर झाली. सुनेत्रा वहिनीचं मोठं सामाजिक काम राहिलेलं आहे. पण वहिनी कधीही प्रकाशझोतात आल्या नाहीत. त्या आता राजकारणत आल्या असून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं माने म्हणाले. तर अजित पवार म्हणजे खमके नेते आहेत. ते शब्दाला पक्के आहेत. बारामतीनंतर इंदापूर तालुक्यात कामं सुरू आहेत. विकास कामे अजित दादाच करू शकतात. म्हणून आम्ही दशरथ माने आणि इतर कुटुंबीयांनी अजितदादांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं प्रवीण मानेंनी सांगितलं.

फडणवीसांनी भेट घेतली अन् भूमिका बदलली

महत्वाची बाब म्हणजे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे इंदापूर तालुक्यातील प्रचार प्रमुख असणाऱ्या प्रवीण माने यांनी आपली भूमिका बदलण्याच्या आधी दोन दिवसापूर्वीच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला.

(Edited By Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com