Rajendra Raut News : भाजप समर्थक अपक्ष आमदार राऊत यांच्या संपत्तीची होणार चौकशी : हायकोर्टाचा आदेश

तीन महिन्यांच्या कालावधीत आंधळकर यांच्या तक्रारीवर उचित कार्यवाही करण्याबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय पीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि आर. एन. लड्डा यांनी दिले आहेत.
Rajendra Raut
Rajendra RautSarkarnama

सोलापूर : बार्शीचे (Barshi) भाजप (BJp) समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी ज्ञात स्त्रोतापेक्षा जादा बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार निवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तीकर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग, तसेच सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्याकडे १४ मार्च २०२१ रोजी केली होती. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये तक्रारीवर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. त्यावर तीन महिन्यांच्या कालावधीत आंधळकर यांच्या तक्रारीवर उचित कार्यवाही करण्याबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय पीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि आर. एन. लड्डा यांनी दिले आहेत. (Barshi MLA Rajendra Raut's assets will be investigated : High Court order)

आमदार राजेंद्र राऊत यांनी बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे, असे याचिकाकर्ते आंधळकर यांच्या मूळ तक्रारीत म्हटले आहे. ही मालमता ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त आहे, अशी तक्रार करून त्याच्या पुष्ट्यर्थ विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना राऊत यांनी सादर केलेली मालमत्ता विवरणाची प्रतिज्ञापत्रे, मालमत्तेचे उतारे, वाहने यांची छायाचित्रे सादर करून वाढलेल्या स्थावर जंगम मालमत्तेचा तक्ता सादर केला होता.

Rajendra Raut
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत भाजपच्या मंत्र्याचे सकारात्मक संकेत

याबाबत संबंधित विभागाकडून कार्यवाही होण्यास विलंब होत असल्याने आंधळकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर १७ जानेवारी २०२३ रोजी सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या धिम्या गतीने होत असलेल्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. पोलिस अधीक्षकांना पुणे विभागात प्रलंबित असलेल्या तक्रारीचा गोषवारा सादर करण्यास सांगितले आहे.

Rajendra Raut
Ajit Pawar : भाजपला उमेदवारही मिळत नाहीत; म्हणूनच आमचे लोक फोडले जात आहेत : अजित पवारांचा आरोप

आंधळकर यांच्या तक्रारीवर किती कालावधीत कार्यवाही करणार, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश देऊन सुनावणी २३ जानेवारी रोजी निश्चित केली होती. त्यानुसार २३ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक यांनी तीन महिन्यात आंधळकर यांच्या तक्रारीबाबत कार्यवाही करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले आहे.

Rajendra Raut
Solapur Politics : सुशीलकुमार शिंदेंप्रमाणे प्रणितींनाही हवाय थेट गांधी परिवाराशी ‘ॲक्सेस’

याचिकाकर्ते यांच्या वतीने ॲड.अभिजीत कुलकर्णी, ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे ए. आर. कापडणीस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, सोलापूर युनिटचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी बाजू मांडली.

Rajendra Raut
Sangali Politics : सांगलीत आबा-काकानंतर ज्युनिअर पाटलांच्या राजकीय संघर्षाला सुरुवात

न्यायालयाच्या आदेशामुळे चौकशी : आंधळकर

आमदार राऊत यांच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा बेहिशोबी मालमत्तेची लाचलुचपत विभागाने सुरू केलेली चौकशी ही न्यायालयाने आदेश दिल्याने सुरू झाली आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे; अन्यथा ही चौकशी कधी होणार होती की होणारच नव्हती, याबाबत स्पष्टता नव्हती, असे याचिकाकर्ते भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com