Barshi : बार्शीत तरुणास मारहाण; माजी नगरसेवकासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

Crime News : सोन्याचे दागिनेही लुटल्याचा आरोप
Crime News
Crime NewsSarkarnama

Solapur News : बार्शीच्या माजी नगरसेवकासह इतर नऊ जणांनी तरुणास तलवार, लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार बार्शी शहरातील तुळजापूर रस्त्यावरील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कमानीसमोर घडला. हल्ल्यात जखमी केल्यानंतर आरोपींनी चेन, अंगठी, रोख वीस हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी माजी नगरसेवक रोहित लाकाळ (Rohit Lakal), विजय साठे, दीपकराज कदम, सुमीत कावळे, बालाजी पवार, वैभव म्हेत्रे, प्रसाद शेळके यांच्यासह अन्य अनोळखी दोघे आदी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी संजय आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

Crime News
MLA Prakash Solanke : चर्चा तर होणारच! आमदार सोळंकेंची 'त्या' वक्तव्यानंतर केसीआर यांची भेट

अधिक माहितीनुसार, फिर्यादी संजय आरगडे हे सतीश आरगडे यांच्यासह बसस्थानकाकडे जात होते. त्यावेळी वरील आरोप तेथे आले. त्यांनी विचारले की, तू परवा सूरज आरगडे याचे भांडण का मिटवले? त्यानंतर त्याचा राग मनात धरुन त्यांनी शिवीगाळ केली. धमकी देऊन, डोक्यात तलवार मारुन जखमी केले. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी दोन तोळ्याची चेन, एक तोळ्याची अंगठी तसेच रोख २० हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com