Karad News : बेडगचा 'लाँग मार्च' कराडात; चौघांची प्रकृती खालावली

Bedags Long March सांगली जिल्ह्यातील बेडग (ता. मिरज) ग्रामस्थ मुंबईकडे चालत निघाले आहेत. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबे लाँग मार्चमध्ये सहभागी आहेत.
Bedag Long March In Karad
Bedag Long March In Karadsarkarnama
Published on
Updated on

-सचिन शिंदे

Karad Long March News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बेडग (ता. मिरज) गावातील स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडल्यानंतर त्या विरोधात त्यांच्या अनुयायांनी पायी लाँग मार्च सुरू केला आहे. घरांना कुलपे लावून बॅगा भरून लोक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तो लाँग मार्च आज कऱ्हाडमधून पुढे मार्गस्थ झाला. मात्र, लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती अशक्तपणामुळे खालावली. त्यांना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

सांगली जिल्ह्यातील Sangali Politics बेडग (ता. मिरज) ग्रामस्थ मुंबईकडे चालत निघाले आहेत. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लाँग मार्चमध्ये LongMarch सहभागी आहेत. १६ जून रोजी बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीने पाडली.

त्यानंतर ग्रामपंचायत विरुद्ध त्यांचे अनुयायी यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यातून समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत माणगाव ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. तो लाँग मार्च कऱ्हाडमध्ये दाखल झाला. मात्र, येथे त्यातील अजित कांबळे, तेजस कांबळे आणि अन्य दोघे अशा चौघांची प्रकृती खालावली आहे.

Bedag Long March In Karad
Sangali Municipal Corporation : लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात नागरिकाला संताप अनावर; आयुक्तांना बूटच फेकून मारला

त्यांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पुन्हा लाँग मार्च मुंबईकडे रवाना झाला. त्यापूर्वी त्यांनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लाँग मार्च सातार्‍याकडे मार्गस्थ झाला. या लाँग मार्चमधील कुटुंबांनी सांगली जिल्हा प्रशासनाने गाव सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत निषेध केला.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com