अकोले ( जि. अहमदनगर ) - देशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्याबद्दल क्रंतिदिनाचे व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अकोले तालुक्यात जल्लोष करण्यात आला.मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. प्रसंगी बोलताना आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.
मधुकरराव पिचड म्हणाले की, देशात यापूर्वी महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाल्या. त्यावेळी त्यांचे सर्वपक्षीयांनी स्वागतच केले. मात्र 75 वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर विरोधी खासदारांनी त्यांचा राष्ट्रपत्नी म्हणून अवमान केला. प्रतिभा पाटील या उच्चवर्णीय होत्या व द्रौपदी आदिवासी आहेत म्हणून अवमान केला, असा आरोप त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मी भाजपत प्रवेश केला. माझ्यासोबत पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांनीही प्रवेश केला मात्र त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका टिप्पणी झाली नाही की आम्ही तुम्हाला पदे देऊन मोठे केले हे म्हंटले नाही. कारण ते त्यांच्या नात्यातील व कुळातील आहेत. मी आदिवासी समाजाचा असल्याने माझ्यावर पद दिले व पक्ष बदलण्याची टीका होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊनही आदिवासी समाजाला मान सन्मान मिळाला नाही. तो राष्ट्रपती सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदी व भाजपने देऊन देशातील आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थाने सन्मान केला. आजपर्यंत आदिवासी समाजाला काही पक्षांनी वापरून घेतले मात्र त्यांना कुठेही सन्मानाचे पद दिले नाही, अशी टीका त्यांनी केली.
भाजप पक्ष आदिवासी समाजाचे कल्याण करणार नाही, हे बिंबवले गेले मात्र मागील आठ वर्षे देशात भाजपचे सरकार आले आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. तिरंगा फडकवण्याचे काम केवळ पुढारी, मंत्री, पदाधिकारी, अधिकारी यांनाच होता. तो अधिकार आता वाडी वस्तीतील माणसांना देण्याचे काम व देशातील सर्वानाच अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार वैभव पिचड असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मागील अडीच वर्षे लोकप्रतिनिधींनी कोटीच्या कोटी उड्डाणे भरली. त्याला साधा रस्ता दुरुस्त करता आला नाही, की बंधारा बांधता आला नाही. 500 कोटी आणले मग त्याचे काय केले. जो माणूस आदिवासी समाजाच्या महिलेस राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकत नाही. क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे देवगाव येथे स्मारक बांधण्यात पुढाकार घेत नाही उलट दुसऱ्या तालुक्यात स्मारक बांधण्यासाठी समितीत जातो. त्याने आदिवासी समाजाचा स्वाभिमान जनतेला शिकवू नये. आता सरकार बदलले आहे. शिंदे फडणवीस यांचे सरकार राज्यात आले आहे. त्याचा निश्चित अकोले तालुक्यात फायदा होईल. मी मंत्री आमदार नसलो तरी तालुक्यात विकास निधी उपलब्ध करून विकास कामे करू, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.