Pandharpur Politic's : मोहोळ आणि सोलापूरचा पोपट काल पंढरपुरात येऊन खूप बोलून गेला. त्या पोपटला माहित नाही. आज या आनंदाच्या आणि उत्साहाच्या सोहळ्यात मी काही बोलणार नाही. पण, उद्यापासून भालके काय चीज आहे, ते त्याला दाखवतो, अशा शब्दांत भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांना खुले आव्हान दिले. (Bhagirath Bhalke's strong reply to Umesh Patil)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. त्या सभेत भालके यांनी उमेश पाटील यांना आव्हान दिले. पंढरपुरात काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पाटील यांनी भगीरथ भालके विधानसभेला कसा निवडून येतो, हे आम्ही पाहतोच, असे विधान केले होते. त्याला भालके यांनी सभेत उत्तर दिले आहे.
सरकोलीत तेलंगणाचे मुख्यमंत्री, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, खासदार यांच्यासह माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माणिकराव कदम हे बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते. भविष्यात लढण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर जगातील कोणीही आले तर त्याच्याशी दोन हात करण्याची अमाची तयारी आहे. भगीरथ भालके हे हैदरबादला जाऊन काय काम करणार आहेत, तर त्यांना सांगतो की अहमदाबादपेक्षा हैदराबाद कधी जवळ आहे. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी मी कधीही मागे हटणार नाही.
माझे वडील आमदार (स्व) भारत भालके यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या परिवाराकडे जादा ध्यान देण्याची गरज होती. मात्र, त्यांच्याकडून मला कोणतीही मदत झाली नाही. आम्हाला मदत करण्याचे त्यांच्या मनातच नव्हते. त्यामुळे आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, अशी अपेक्षाही भगीरथ भालके यांनी व्यक्त केली.
मी आज कुठल्याही पक्षावर आणि कोणत्या नेत्यावर टीका करणार नाही. सरकार कुणाचेही येऊ द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी नुसता संबंधित शेतकऱ्याने सातबारा उतारा सरकारकडे दिला, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक लाख एक हजार 116 रुपये ची रक्कम मुलीच्या वडिलाला आधार म्हणून देण्याची भूमिका केसीआर सरकारने घेतलेली आहे. दलित समाजातील व्यक्तीला व्यवसायासाठी दहा लाख रुपयांची रक्कम शासनाच्या वतीने दिली. यातली एक जरी योजना आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारकडून होत असेल तर आम्ही तेलंगणात परत जाऊ अशी भूमिका केसीआर यांनी मांडली. पण राज्यातील एकही नेत्याने तसा शब्द आपल्या शेतकऱ्यांना दिलेला नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंतही भालके यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.