Sharad Pawar, Bhai Jagtap
Sharad Pawar, Bhai Jagtapsarkarnama

Karad Congress News : भाई जगताप यांनी स्पष्टच सांगितले; पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पवारांनी जाणे आम्हाला खटकलेच...

Congress Leader Bhai Jagtap कॉंग्रेस पक्षातर्फे राज्यात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरु आहेत. त्याअंतर्गत साताऱ्याचे निरीक्षक म्हणुन आमदार जगताप हे कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर आले होते.

-हेमंत पवार

Karad Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातील एका कार्यक्रमात खासदार शरद पवार सहभागी झाले होते. आम्हाला कॉंग्रेस म्हणुन विचाराल तर सध्याच्या बदलत्या परिस्थितीत आम्हाला ते खटकलेच आहे, असे सुचक वक्तव्य आमदार भाई जगताप यांनी आज कऱ्हाड (जि.सातारा) येथे व्यक्त केले.

कॉंग्रेस पक्षातर्फे Congress राज्यात लोकसमभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरु आहेत. त्याअंतर्गत साताऱ्याचे निरीक्षक म्हणुन आमदार जगताप Bhai Jagtap हे कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांना माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यातील त्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी खासदार पवार हे गेले होते. त्यांच्या उपस्थितीवरुन त्यांच्या सहकारी पक्षातील काही नेत्यांकडुन नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या प्रश्नावर आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती उच्चकोटीची आहे. राजकीय मतभेद असु शकतात. मात्र मनभेद असु शकत नाही. त्यामुळे शरद पवार पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला गेले याबद्दल आम्हाला काहीही वाटत नाही. सुशिलकुमार शिंदेही त्या कार्यक्रमास होते.

Edited By : Umesh Bambare

Sharad Pawar, Bhai Jagtap
Bhai Jagtap ; Dharavi 'तील माणूस मुंबई बाहेर फेकला जाणार | adani group project | Dharavi development

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com