भानुदास मुरकुटे म्हणाले, विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही...

या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) यांच्या पॅनेलने सर्व जागा मिळवत वर्चस्व राखले.
Bhanudas Murkute, Shrirampur
Bhanudas Murkute, ShrirampurSarkarnama
Published on
Updated on

बापूसाहेब कोकणे

टाकळीभान ( जि. अहमदनगर ) : अशोक सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) यांच्या पॅनेलने सर्व जागा मिळवत वर्चस्व राखले. त्यामुळे या कारखान्यावरील 33 वर्षांपासूनची सत्ता भानुदास मुरकुटे यांनी राखली. Bhanudas Murkute said, faith will not be shattered ...

बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील नूतन संचालकांचा सत्कार समारंभ झाला. अध्यक्षस्थानी प्रकाश नाईक होते. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सुभाष पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, द्वारकानाथ बडधे, सुवालाल लुक्कड, अनिल पा. नाईक, जालिंदर कुऱ्हे, भास्कर खंडागळे, विलास मेहेत्रे, उपसरपंच अभिषेक खंडागळे, दत्ता कुऱ्हे, भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ, शेषराव पवार, प्रकाश नवले, प्रभाकर कुऱ्हे, सुरेश कुऱ्हे, साहेबराव वाबळे उपस्थित होते.

Bhanudas Murkute, Shrirampur
अशोक कारखाना निवडणुकीत सासरा विरुद्ध सून असा सामना रंगणार

भानुदास मुरकुटे म्हणाले, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी लोकसेवा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले. आमच्यावर तुम्ही दाखविलेल्या विश्वासास कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही.

Bhanudas Murkute, Shrirampur
भानुदास मुरकुटे म्हणाले, युवा पिढीने ‘अशोक’ चा इतिहास जाणून घेतला पाहिजे...

मुरकुटे पुढे म्हणाले की, आसपासच्या तालुक्यांतील साखर कारखान्यांची काय अवस्था आहे, हे सुज्ञ मतदारांना ज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी लोकसेवा मंडळाच्या सर्व संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले. कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर ऊस आणला. या उसालाही सभासदांप्रमाणेच भाव दिलेला आहे. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा विचार असून, आधुनिक तंत्रज्ञानासह पाच हजार टन क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. तसेच वीजनिर्मितीतही वाढ करण्याचे नियोजन असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.

जालिंदर कुऱ्हे, बाळासाहेब वाबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले. महेश कुऱ्हे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल नाईक यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com