भानुदास मुरकुटेंच्या लोकसेवा विकास पॅनेलची सरशी

अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Banudas Murkute ) यांच्या समोर त्यांचीच सून असलेल्या डॉ. वंदना मुरकुटे ( Dr. Vandana Murkute ) व शेतकरी संघटनेने मोठे आव्हान उभे केले आहे.
Bhanudas Murkute, Shrirampur
Bhanudas Murkute, ShrirampurSarkarnama
Published on
Updated on

बापूसाहेब कोकणे

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रियेने श्रीगोंदा व श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले. श्रीगोंद्यातील नागवडे साखर कारखान्यावर राजेंद्र नागवडे यांनी वर्चस्व राखले. तर श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Banudas Murkute ) यांच्या समोर त्यांचीच सून असलेल्या डॉ. वंदना मुरकुटे ( Dr. Vandana Murkute ) व शेतकरी संघटनेने मोठे आव्हान उभे केले आहे. या अशोक सहकारी साखर कारखान्यासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळ पासूनच मतमोजणी सुरू झाली असून भानुदास मुरकुटेंच्या लोकसेवा पॅनेलची सरशी होत असल्याचे प्राथमिक चित्र आहे. Bhanudas Murkute's Public Service Development Panel at the forefront

या कारखान्यावर भानुदास मुरकुटे यांचे 30 पेक्षाही जास्त वर्षांपासून वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांना माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजिव करण ससाणे यांनी साथ दिली आहे. तर शेतकरी संघटनेने त्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. शेतकरी संघटनेच्या पॅनेलमध्ये श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे, श्रीरामपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांचाही समावेश आहे. त्यामुळे कधी नव्हेते अशोक साखर कारखाना निवडणुकीत भानुदास मुरकुटे यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान उभे केले होते.

Bhanudas Murkute, Shrirampur
भानुदास मुरकुटे सत्ता राखणार की सूनबाई सूत्रे हाती घेणार!

श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी (ता. 16) मतदान प्रक्रिया झाली. कारखान्याच्या 11 हजार 774 सभासद मतदारांपैकी 10 हजार 898 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारखान्यासाठी एकूण 93 टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणातील 42 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे लोकसेवा विकास मंडळ व शेतकरी संघटनेचे ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलचे एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दुपारी दीड वाजेपर्यंत सहा जागांचे निकाल हाती आले होते. यात विजयी सहा उमेदवार लोकसेवा विकास मंडळाचे आहेत. त्यामुळे सध्या तरी भानुदास मुरकुटे यांचे वर्चस्व सिद्ध होताना दिसत आहे.

Bhanudas Murkute, Shrirampur
भानुदास मुरकुटे म्हणाले, युवा पिढीने ‘अशोक’ चा इतिहास जाणून घेतला पाहिजे...

आतापर्यंतचे विजयी उमेदवार

महिला राखीव

शीतल आबासाहेब गवारे (6586 मते) व हिराबाई ज्ञानदेव साळुंके (6222 मते)

इतर मागासवर्गीय

अमोल बाबासाहेब कोकणे (6398 मते)

अनुसुचीत जाती जमाती

यशवंत दिनकर रणवरे (6624 मते)

भटक्या जाती जमाती

योगेश भाऊसाहेब वितनोर (6085 मते)

सोसायटी मतदार संघ

सोपान राऊत ( 48 पैकी 43 सोसायट्यांची मते)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com