तुमच्यावर कसलेही संकट आले तर या भावाला एक हाक द्या : हसन मुश्रीफांचे आवाहन

कोरोना महामारीने सौभाग्य गमावलेल्या बहिणींसाठी ग्रामविकास विभागाच्या नवी योजना सुरु केली आहे.
Hasan mushrif
Hasan mushrifSarkarnama

कागल (जि. कोल्हापूर) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कागल येथे हृदयस्पर्शी भाऊबीज सोहळा झाला. भावनिक अशा या सोहळ्यात कोरोनाकाळात सौभाग्य गमावलेल्या ८०० वर भगिनींनी मंत्री मुश्रीफ यांचे औक्षण केले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शूर महाराणी ताराराणी यांच्याप्रमाणे लढाऊ बाण्याने जिद्दीने लढा, अशी ऊर्जा त्यांनी माता-भगिनींना दिली. (bhaubeej ceremony in the presence of Hassan Mushrif in Kagal)

मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुमच्यावर कसलेही संकट आले तर या भावाला एक हाक द्या, तुमचा हा भाऊ तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे. तुम्ही एकाकी नाही. कोरोना महामारीने सौभाग्य गमावलेल्या बहिणींसाठी ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेदने वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा या नावाने नवी योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत अशा माता भगिनींनी स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानजनक उपजीविकेसाठी रोजगार, स्वयंरोजगार व व्यवसायासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, बचत गटांसाठी बिनव्याजी कर्ज व अनुदान तसेच व्यवसायासाठीही निधी दिला जाणार आहे.

Hasan mushrif
भाजप नेत्यांसाठी पुढील दोन दिवस असणार कसरतीचे!

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, नबीला मुश्रीफ,अमरीन मुश्रीफ, वृषाली पाटील, मंगल गुरव, रहिमा मकानदार, पद्मजा भालबर, चंद्रकांत पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, पी. बी. घाटगे, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, संगीता गाडेकर, आशाकाकी माने, सबिना मुश्रीफ, रमेश तोडकर, शशिकांत खोत, शिल्पा खोत, अर्चना पाटील, अंजना सुतार,विकास पाटील,शर्मिली मालणकर, नम्रता भांदिगरे, उषा सातवेकर, संजय चितारी, राजश्री माने आदी उपसस्थित होते. मनीषा पाटील यांनी स्वागत केले. शीतल फराकटे यांनी प्रास्तविक केले. शैलजा पाटील यांनी आभार मानले.

Hasan mushrif
डॉ. अमोल कोल्हेंच्या पोस्टने खळबळ : राजकीय वाटचालीचे गूढ वाढले!

थेट मला फोन करा

शासकीय योजनांचा लाभ तातडीने द्यावयाचा तसेच घरकुलासह जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, या सर्व कामांत संदर्भात सरकारी अधिकारी, कर्मचारी ऐकत नसेल तर ‘थेट मला फोन करा, असे आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com