गावोगावी लागले धनंजय महाडिक यांच्या आभाराचे फलक!

भीमा साखर कारखाना रेडझोनच्या बाहेर; यंदाच्या गाळप हंगामास मिळाली परवानगी
 Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्याच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यास 2021-22 या हंगामासाठी गाळप परवाना मिळाला असून कारखाना रेडझोनच्या बाहेर आला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिली. यामुळे भीमा कारखान्याच्या विरोधातल्या बऱ्याच चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. (Bhima Sugar Factory outside Redzone; Sugarcane crushing licensed : Dhananjay Mahadik)

भीमा सहकारी साखर कारखाना गेल्या गाळप हंगामातील 28 कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देणे होता. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची अशीच अवस्था होती. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी पूर्ण केल्याशिवाय त्यांना गाळप परवाना देऊ नये. तसेच, त्यांच्यावर आरआरसीची कारवाई करावी, अशी मागणी अनेक शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे साखर आयुक्तांनीही कारखान्यावर या प्रश्नी कारवाईचा बडगा उगारला होता. भीमा कारखान्याकडे 28 कोटींची थकीत एफआरपी होती, तर गोदामात सुमारे 70 कोटी रुपयांची साखर शिल्लक होती, त्यामुळे भीमा कारखान्याला एफआरपी देणे अडचणीचे झाले होते. दरम्यान, कारखाना सुरू होणार का, शेतकऱ्यांना पैसे मिळणार का, गाळप परवाना मिळणार का अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू होती.

 Dhananjay Mahadik
आता अशोक चव्हाण, अमित देशमुख, अर्जुन खोतकारांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अध्यक्ष महाडीक यांनी राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची अडचण मांडली. त्याची दखल घेत आरआरसी अंतर्गत भीमा कारखान्याला साखरविक्रीची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपी पूर्ण झाली. अडचणीवर मार्ग काढून एफआरपी पूर्ण केल्याबद्दल तालुक्‍यातील अनेक गावांत अध्यक्ष महाडिक यांच्या आभाराचे फलक लावण्यात आले आहेत.

 Dhananjay Mahadik
त्या मेसेजनंतर थेट केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचाच फोन आला आणि म्हणाले, ‘बोला शरदराव...’

राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई झाली. मात्र, चर्चा फक्त भीमा कारखान्याचीच सुरू होती. चालू गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी सुमारे नऊ लाख टन उसाची नोंद आहे. सर्व ऊस वेळेत गाळप करून कारखाना बंद होण्याअगोदर शेतकऱ्यांचे सर्व पैसे देण्यात येतील. तसेच, इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भावही चांगला देऊ, अशी ग्वाही अध्यक्ष महाडिक यांनी दिली. या वेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.

कुठल्याही काट्यावर उसाचे वजन करा

भीमा साखर कारखान्याच्या वजन काट्यावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस कुठल्याही काट्यावर वजन करून आणावा आणि तो भीमा कारखान्याला द्यावा, असे आवाहनही माजी खासदार महाडिक यांनी या वेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com