भाजप नगरसेवकाने फोडले महावितरणचे कार्यालय

राज्यात विजेची टंचाई सुरू झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे.
Manoj Kotkar
Manoj KotkarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यात विजेची टंचाई सुरू झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे. या वीज भारनियमना विरोधात अहमदनगर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केडगावमधील महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. ( BJP corporator blows up MSEDCL office )

देशात दगडी कोळशाची टंचाई आहे. अशातच उन्हाळा असल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्या मानाने वीज निर्मिती कमी होत असल्याने विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून भारनियमन सुरू झाले आहे.

Manoj Kotkar
मनोज कोतकर राष्ट्रवादीचेच ! भाजपकडून कारवाई अटळ

महावितरणकडून भारनियमनाची कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. अहमदनगर शहरातील उपनगरे व जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज भारनियमन सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. आठवड्या भरापासून अहमदनगर शहराचे तापमान 40 अंशावर गेले आहे. हवामान विभागाने आगामी तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Manoj Kotkar
मंत्रीमंडळाचे भारनियमन टाळण्यासाठी प्रयत्न : महावितरणला दिले हे अधिकार

ऐन उन्हाळ्यात भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांचा महावितरणावरील रोष वाढू लागला आहे. नगरसेवक मनोज कोतकर यांनी दुरध्वनीवरून महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुरध्वनी बंद असल्याने मनोज कोतकर हे आज सायंकाळी केडगाव येथील महावितरण कार्यालयात गेले. तेथे कोणीही अधिकारी नसल्याने संतप्त झालेल्या मनोज कोतकर यांनी महावितरण कार्यालयाच्या टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांना या पुढे नागरिकांचा फोन उचलून उत्तरे द्या अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com