गिरणी कामगाराचा मुलगा आठ खात्यांचा मंत्री झाल्याने कित्येकांचा जळफळाट होतोय...

Chandrakant Patil|Satej Patil|Sharad Pawar|BJP|NCP|Raj Thackeray : राज ठाकरेंनी काल केलेले भाषण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करुन देणारे होते, असे मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : माझ्यासारखा, सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्याची आठ खाती सांभाळली हे दोन्ही काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना सहन होत नाही. म्हणून दोन्ही काँग्रेसचे नेते माझ्यावर टीका करत असतात. सतेज पाटील, (Satej Patil) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासारखा मी काही सोन्याचा चमचा घेउन जन्माला आलो नाही,' असा टोला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कॅाग्रेस आणि राष्ट्रवादीला (NCP) लगावला. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचे राजकारण वाढले या त्यांच्या वक्तव्यावर आपण २०० टक्के सहमत असल्याचे पाटीलांनी म्हटले आहे. त्यांनी आज (ता. 3 एप्रिल) कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला.

Chandrakant Patil
राज ठाकरेंच्या भाषणावर मराठमोळ्या अभिनेत्रीनं उधळली 'प्राजक्ताची फुलं'

राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीचे राजकारण वाढले या राज यांच्या वक्तव्यावर आपण २०० टक्के सहमत आहे. ठाकरेंनी काल केलेले भाषण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करुन देणारे होते. राज यांच्या भाषणाने सामान्य हिंदूना समाधान वाटले असून माझ्यासारखा, सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्याची आठ खाती सांभाळली हे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सहन होत नाही. म्हणून दोन्ही काँग्रेसचे नेते माझ्यावर टीका करत असतात. सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखा मी काही सोन्याचा चमचा घेउन जन्माला आलो नाही,' असा जोरदार टोलाही पाटलांनी लगावला.

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करण्यास नकार दिल्याकडे लक्ष वेधतांना पाटील म्हणाले की, 'बुडत्या जहाजाचे कॅप्टनशिप स्वीकारायला कोणी तयार नसते, म्हणून पवारांनी यूपीएचे नेतृत्व करण्यास नकार दिला असावा. पवारच जर यूपीएचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार देत असतील तर संजय राऊतांची उठाठेव कशासाठी?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली.

Chandrakant Patil
Devendra Fadanvis : राज ठाकरे सत्यच बोलले, शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला..

पवारांची आणि त्यांच्या पक्षाची प्रत्येक कृती ही जातीशी निगडीत असून सर्वसामान्य कुटुंबांतील माणसे मोठी झालेली त्यांना पाहावत नाही. घराणेशाही आणि नातेवाईकांचे हितसंबंध जोपासण्याचे राजकारण राष्ट्रवादीने केले आहे. राष्ट्रवादीने प्रत्येक मतदारसंघात जातीयवादी राजकारण केले आहे. हा पक्ष मतदारसंघात जातनिहाय मतदारपाहून गणितं आखतो राष्ट्रवादी हा खरा जातीयवादी पक्ष आहे, असा हल्लाबोल पाटलांनी राष्ट्रवादीवर केला.

पवारांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त केल्यानंतरही जातीचा रंग देण्याचा प्रयत्न केला होता. राज्यसभेवर खासदार नियुक्ती झाल्यानंतर 'आता पेशवे, राजे ठरविणार का ?, असे विधान पवारांनी केले होते. पवारांनी संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली आणि पाडले. मात्र, आमच्या कालावधीत संभाजीराजेंची राष्ट्रपतीच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर पवारांनी या प्रकरणास ब्राह्मण आणि ब्राम्हणेतर रंग देण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप पाटलांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com