Ram Shinde News : बाजार समितीच्या निवडणुकीवरुन नगरमध्ये राजकारण तापले; विखे पिता-पुत्रांवर राम शिंदेंचे गंभीर आरोप

Radhakrishna Vikhe Patil News : अहमदनगरमध्ये भाजपमधील मतभेत चव्हाट्यावर
Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil
Ram Shinde, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil News : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज (ता. १६) पार पडली. या निवडीमध्येही दोन्ही गटाला समसमान मते मिळाली. त्यानंतर सभापती आणि उपसभापती पदासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली.

या मध्ये सभापती पद आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या गटाकडे गेले. तर उसभापतीपद हे आमदार रोहित पवार यांच्या गटाकडे गेले. यावरुन आता नगरमध्ये राजकारण रंगले आहे. भाजपा नेते राम शिंदे यांनी राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil
Rahul Narvekar News : आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासाठी कोणते निकष लावणार? नार्वेकर म्हणाले, जून-जुलैमध्ये...

बाजार समितीच्या निवडणुकीवरुन आता भाजपामध्ये राजकारण पेटले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या पॅनलला सम-समान जागा मिळाल्या होत्या. त्यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

राम शिंदे म्हणाले, ''बाजार समितीमध्ये भाजपाचा सभापती झाला. भाजपाच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात आलेली आहे. खासदाराचे आणि पालकमंत्र्यांचे सहकार्य अपेक्षीत होते. मात्र, ते मिळाले नाही. त्यांचे एक पीए आणि बंधु यांनी विरोधात अर्ज भरला. एक कार्यकर्ता होता तोही विरोधात गेला. आम्ही उमेदवारी देतो म्हणून सांगितले. मात्र, पहिल्या दिवसापासून आमच्या भूमिकेला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली.''

Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil
Nitin Gadkari Threat News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिसऱ्यांदा धमकीचा फोन; पोलीस अलर्ट

''शेवटच्या टप्प्यात देखली सहकार्य करतो असे सांगितले. मात्र, सहकार्य मिळालेच नाही. आज त्यांनी आमच्या विरोधात उपसभापती पदासाठी अर्ज भरला. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. एवढ्या मोठ्या शक्तीच्या पवारांच्या विरोधात निवडणूक लढली. जिल्हा बॅकेच्या संचालकाच्या विरोधात लढली. खासदारांच्या विरोधात लढली. भाजपाने खासदार केले, आमदार केले, मंत्री केले. दुसऱ्या क्रमाकांचे पद दिले. मी हा विषय नेतृत्वाच्या कानावर घालणार असल्याचेही'' राम शिंदे यांनी सांगितले.

''विखे पाटील ४० वर्ष ज्या पक्षात होते, त्या पक्षाने त्यांना जे दिले नाही, ते भाजपाने दिले. खासदार झालेत, आमदार झालेत, मंत्री झालेत. पण मंत्री कोणते झालेत तर महसुल मंत्री. अशा परिस्थितीमध्ये मला वाटल नाही ते असे करतील. मात्र, प्रत्यक्षात आता मी ते अनुभवतो आहे. ज्या पक्षात राहतात त्याच पक्षाला विरोध करायचा हे आज देखील त्यांचे चालू आहे. मात्र, हा काँग्रेस नाही, तर भाजपा आहे, हे त्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता,'' असल्याचेही राम शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com