'हनीट्रॅप'मधील भाजप नेत्याचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल!

याच नेत्याने सात जुलै रोजी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
BJP Leader-HoneyTrap
BJP Leader-HoneyTrapSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका बड्या नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित नेत्याने आपली फसवणूक केल्याचे या व्हिडिओत ती महिला सांगत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच नेत्याने सात जुलै रोजी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आता त्या नेत्याचा थेट बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (BJP leader's bedroom video's viral)

संबंधित नेता हा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सध्या जिल्ह्यात मोठ्या पदावर आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत संबंधित महिला आणि तो नेताच दिसत आहे. हा नेता अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेला आहे. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन या नेत्याचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हे वाक्य ऐकताच तो नेता बेडवरून उठला आणि त्याने मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित नेत्याने त्या महिलेवर हनीट्रॅपचा आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांची सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

BJP Leader-HoneyTrap
भाजपनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं; ‘एनडीए’च्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण!

सोलापूर जिल्ह्यात हा नेता मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्या नेत्याने पोलिस ठाण्यात तक्रार देऊन संबंधित महिलेले आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले हेाते, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे तो नेमका कोणी केला, अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्या नेत्याचा थेट बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षही कोणती भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. एरव्ही आपण इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत, असा दाखवणारा भाजप या प्रकरणात संबंधित नेत्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

BJP Leader-HoneyTrap
प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त अधिकाऱ्यांना परत बोलवा : महेश लांडगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तक्रारीत त्या नेत्याने काय म्हटले होते?

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका महिला मुंबईत घर आणि दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले होते. पैसे दिले नाही तर राजकीय आणि सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकीही दिली होती. त्या तक्रारीनुसार महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com