नाना कदम जिंकणार; फडणवीसांनी सांगितली कोल्हापूरची 'पोलिटिकल केमिस्ट्री'

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून सत्यजित कदम (Satyajeet Kadam) रिंगणात आहेत. तर काँग्रेसने (Congress) जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उतरवलं आहे. शिवसेना (Shiv Sena) व राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे. मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदार मोठा असून ती सर्व मतं जाधव यांच्या पारड्यात पडतील, असा दावा महाविकास आघाडीकडून (MahaVikas Aghadi) केला जात आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'पोलिटिकल केमिस्ट्री' सांगत हा दावा फेटाळून लावला आहे.

आमदार चंद्रकांत जाधव (Chanrakant Jadhav) यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. या मतदारसंघात १२ एप्रिलला मतदान होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कोल्हापूरात सभा घेत आघाडी सरकारवर शरसंधान झाले. तर रविवारी पत्रकार परिषदेत बोलतानाही त्यांनी कोल्हापूर मतदारसंघात सत्यजित नाना कदम यांचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. आघाडीसोबत शिवसेना असली तरी शिवसेनेची सर्व मते भाजपलाच मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

Devendra Fadnavis
राहुल गांधींचा गौप्यस्फोट; मायावतींना दिली होती ऑफर पण...

कोल्हापूरातील 'पोलिटिकल केमिस्ट्री' बदलली असल्याचे फडणवीसांनी सांगितले. ते म्हणाले, भाजपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: हा मतदारसंघ हिंदूत्ववादी आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजप त्यांच्यासोबत होती. त्यामुळे आमच्या विचाराला मानणारा मतदारसंघ आहे. आता काँग्रेस हा मतदारसंघ लढवत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे.

राजकारणात 'पोलिटिकल अरिथमेटक' चालत नाही. तर पोलिटिकल केमिस्ट्री चालते. इथल्या मतदाराची 'पोलिटिकल केमिस्ट्री' पूर्णपणे बदलली आहे. मतदार शिवसेनेचा आहे म्हणून काँग्रेसला मतदान करेल, असं अरिथमेटिक लावले जात आहे. पण तो आता लागणार नाही. पोलिटिकल केमिस्ट्री भाजपच्या बाजूने आणि भगव्याच्या बाजूने आहे, हे उत्तर कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; भाजपचा 'तो' तरूण पुढारी कोण?

शिवसेनेची सगळी मतं आमची

शिवसेनेची किती मतं भाजपला पडतील, या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेतील सगळेच मतदार आमच्यासोबत आहेत, असा दावा केला. कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात दहशदतीचे वातावरण आहे. ज्याप्रकारे सत्तापक्षाचे नेते, मंत्री दहशत पसरवण्याचे काम करत आहेत, महाराष्ट्र आहे की बंगाल, असा प्रश्न उपस्थित व्हावा, असं काम होताना दिसत आहे. पण या दहशतीला झुगारून लोकं मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भाजपचाच विजय होईल. कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे, एकतरी विकास दाखवू शकतात का? आमच्या सरकारच्या काळात झालेली कित्येक कामे आम्ही दाखवू शकतो. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सरकार स्वत:पलिकडे पाहू शकत नाही, अशी भावना लोकांची झाली आहे, असं फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने एकही काम कोल्हापूर साठी केलेले नाही. आम्हीच केलेली कामं दाखवत आहेत. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला विजय मिळेल. भाजपचे 107 वे आमदार म्हणून सत्यजित कदम निवडून येतील. पंढरपुरला पांडूरंगाचा आशीर्वाद मिळाला आहे. आता आई अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल. कोल्हापूरमध्ये दहशतीचं वातावरण आहे. बारा तारखेला काय करायचं, हे लोकांचा ठरलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com