संभाजीराजेंच्या पक्षात जाणार का? शिवेंद्रराजेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...

संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
BJP MLA Shivendraraje Bhosale, Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News
BJP MLA Shivendraraje Bhosale, Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिलेला शब्द मोडला, असा आरोप त्यांनी केला आहे. ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. या राजकीय घडामोडींवर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendraRaje Bhosale) यांचीही प्रतिक्रिया आली आहे. (SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News)

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींवर त्यांनी जाहीरपणे भाष्य केले. त्यांची नाराजी यावेळी स्पष्टपणे दिसत दिसत होती. (BJP MLA ShivendraRaje Bhosale criticizes MahaVikas Aghadi)

BJP MLA Shivendraraje Bhosale, Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला! संभाजीराजेंनी केला गौप्यस्फोट

संभाजीराजेेंचा गेम झाला!

संभाजीराजेंच्या माघारीवर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, मला वाटतंय संभाजीराजेंचा गेम झाला आहे. हे कुणी केलं त्यांना माहिती आहे. संभाजीराजेंच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे. मराठा आऱक्षण, गडकिल्ले संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान अमुल्य आहे. त्यामुळे छत्रपती घऱाण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असं शिवेंद्रराजे म्हणाले.

संभाजीराजेंच्या पक्षात जाणार का?

संभाजीराजेंनी पक्ष काढल्यास त्यांच्या पक्षात जाणार का, असा थेट प्रश्न पत्रकारांनी शिवेंद्रराजेंना विचारला. त्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते म्हणाले, मी आता भाजपचा आमदार आहे. ज्या पक्षात आहेत, तिथेच राहणे चांगले. उगाचच या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं योग्य नाही.

BJP MLA Shivendraraje Bhosale, Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News
माझी ताकद 42 आमदार नाही तर..! संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य

मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला

शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा केल्यानंतर मी कागदपत्रांची तयारी करण्यासाठी कोल्हापूरला निघालो. कोल्हापूरात गेल्यानंतर समजले संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. जे खासदार बैठकीत होते, त्यांना फोन केला पण ते काहीही बोलू शकले नाहीत. मुख्यमत्र्यांना फोन केला, पण त्यांनी फोन घेतला नाही. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी दिलेला शब्द मोडला, अशी नाराजी संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com