भाजप खासदार निंबाळकरांवर कोट्यावधींच्या फसवणुकीचा आरोप

भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinha Naik Nimbalkar) यांच्यावर फसवणुकीचे आरोप काय आहे प्रकरण?
Ranjitsinha Naik Nimbalkar
Ranjitsinha Naik NimbalkarSarkarnama

फलटण : भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinha-naik-nimbalkar) यांच्यावर त्यांचे निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनीच आरोप केला आहे. स्वराज ॲग्रो इंडिया ॲग्रो लिमिटेड या कारखान्याचे व स्वराज नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी खोटी बीले देऊन आपली चार कोटी ४० लाखांची फसवणूक केली. त्यामुळे खासदार निंबाळकर व सर्व संचालकांविरुध्द विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी दिगंबर आगवणे यांनी फलटण पोलिस स्टेशनला केली आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलिस (Police) ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे की ''२००७ मध्ये रणजितसिंह यांच्याशी आपला संपर्क आला. डेअरीच्या बॉयलरसाठी त्यांना लाकडे पुरवीत असल्याने आमच्यात आर्थिक व्यवहार होते. रणजितसिंह यांना कारखाना उभारणीसाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे २०१४ ला त्यांची पिंपळवाडी येथील जमिन गहाण ठेवत कारखान्यास कर्ज मिळविण्यासाठी व कारखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर डिस्टलरी प्रोजेक्टसाठी वेळोवेळी मोठ्या रकमेचे कर्ज खासदार रणजितसिंह व संचालकांनी बँकांच्या संमतीने काढले. घनिष्ट संबंधापोटी सदर कर्जासाठी माझी जमिन गहाण ठेवली आहे. कारखाना सुरु झाल्यानंतर कोजन (वीज निर्मिती) बाबत व त्याच्या उत्पन्नाबाबत तोंडी व्यवहार झाला. त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने आपण नांदल, गिरवी येथील जमिनी गहाण ठेवून कर्ज काढले, त्याची रक्कम आरटीजीएसद्वारे खासदार रणजितसिंह यांच्या खात्यावर जमा केली, असा दावा, आगवणे यांनी केला आहे.

Ranjitsinha Naik Nimbalkar
यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

नोव्हेंबर २०१७ मध्ये आयूर ट्रेडर्स कंपनीच्या खात्यातून स्वराज कारखान्याच्या खात्यावर बग्यास खरेदीसाठी पाठविलेल्या रकमेचे मला बिल मिळाले नाही. प्रत्यक्षात खासदारांनी टर्न ओव्हर दाखवण्यासाठी मला ७ ते ८ कोटी रुपयांची खोटी बीले देत माल विक्री केल्याचे दाखविले. सदर कंपनी २०१८ मध्ये आगीत भस्मसात होवून माझे ७ कोटींचे नुकसान झाले. त्यावेळी खासदार रणजितसिंह यांनी खोट्या बिलांचा माल कंपनीत दाखवून विम्याचा क्लेम करण्यासाठी धमकावले होते, असा आरोपही आगवणे यांनी केला आहे.

खासदार हे स्वराज पतसंस्थेचे चेअरमन असल्याने त्यांनी २०१३ मध्ये पत्नीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माझ्या नावे कर्ज काढले होते. २०१६-१७ मध्ये आपल्या वाद सुरु असलेल्या सुरवडी येथील जमिन खासदारांनी गहाण ठेवत मोठे कर्ज घेतले. सदर प्रकरणात आपल्या सह्या असल्या तरी मला रक्कम मिळाली नाही. त्यापैकी त्यांच्या कारखान्याने परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेत भरल्याचे मला समजले. खासदार रणजितसिंह यांना दिलेल्या कर्जापायी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव काढल्याची नोटीस बँकेकडून मला मिळाली आहे.

Ranjitsinha Naik Nimbalkar
एखाद्याला राजकारणातूनच नाही तर आयुष्यातून उठवायचं राजकारण सुरू आहे..

सदर प्रकारामुळे रणजितसिंह व स्वराज कारखाना व पतसंस्था यांचे सर्व संचालक यांनी संगनमताने विश्वासघात करुन फसवणूक केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा. रणजितसिंह हे भाजपचे (BJP) खासदार असल्याने ते पदाचा गैरवापर करुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता व्यक्त करुन त्यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचेही आगवणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत खासदार निंबाळकर हे स्वतंत्रपणे आपली बाजू मांडणार आहेत. त्यांची बाजू कळाली की ती 'सरकारनामा'वर देण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com