Chandrakant Patil On Vinod Tawde : विनोद तावडेंना लवकरच मोठी संधी, चंद्रकांत पाटलांचे विधान

Maharashtra Bjp : आज सगळा पक्षा चालवण्या मागे विनोद तावडे यांची भूमिका मोठी आहे. त्यांच्या बाबतीत खूप ऑप्शन्स चर्चिले जात आहेत ते काहीही झाले तरी मोठेच होतील.
chandrakant Patil - Vinod Tawade
chandrakant Patil - Vinod TawadeSarkarnama

Kolhapur News : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे कर्तुत्वान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसे मिळेल असे सगळे बारकावे पाहतात. लवकरच त्यांना मोठी संधी मिळू शकते, असे विधान भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्याबाबतीत अनेक ऑप्शन्स चर्चिले जात आहेत, त्यांना मोठी जबाबदारी पक्षाकडून मिळू शकते, असे संकेत त्यांनी दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मंगळवारी 65 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी पाटील यांनी विविध महत्वाच्या विषयांवर भाष्य करत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे तोंडभरून कौतुक केले. पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये बदल होणार का ? याची उलटसुलट चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

तावडे हे 1995 साली महाराष्ट्राचे सरचिटणीस झाले. त्यानंतर ते मुंबईचे अध्यक्ष झाले. राज्याच्या मंत्रीमंडळात देखील त्यांनी काम केले आहे. आताही ते ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेलेत ते जनरल सेक्रेटरी झालेत. आज सगळा पक्षा चालवण्या मागे त्यांची भूमिका मोठी आहे. त्यांच्या बाबतीत खूप ऑप्शन्स चर्चिले जात आहेत ते काहीही झाले तरी मोठेच होतील. मला खूप आनंद होईल असे सांगतानाच केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं आणि काय नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

chandrakant Patil - Vinod Tawade
Chandrakant Patil : मोदींना लोकसभेत कमी जागा मिळाल्यानं जग हळहळलं; चंद्रकांत पाटलांचं अजब विधान

भाजपमध्ये खूप माणस आहेत जो ज्या पदावर आहे. त्याचा कार्यकाळ संपला की तो बदलला जातो. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीला सुद्धा कळत नाही, असे पाटील म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या निमित्ताने खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. काही कारणाने उमेदवारी घोषित करण्यास जो उशीर झाला, ते लक्षात घेऊन यावेळी नक्कीच दुरुस्ती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com