Atulbaba Bhosale : अतुलबाबा भोसलेंसाठी भाजप आताच लागली कामाला; साताऱ्यात घडामोडींना वेग

Devendra Fadnavis, Satara BJP : कराडमधील 10 किलोमीटर रस्त्यासाठी CRIF अंतर्गत 50 कोटीचा निधी
Atulbaba Bhosale
Atulbaba BhosaleSarkarnama

Satara Political News : निवडणुकाचा धडाका केव्हाही सुरू होवू शकतो, त्यामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी सत्ताधारी सरकार पक्षातील नेते, मंत्री कामाला लागले आहेत. निवडणुकाच्या तोंडावर विकासकामांचा धडाका लावला असून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून छप्पर फाडके निधी आला आहे. गेल्या दोन विधानसभेला कडवी झुंज देणाऱ्या डॉ. भोसले यांच्या आगामी विजयासाठी भाजपकडून पेरणीच म्हणावी लागेल.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेले दोन टर्म डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) भाजपकडून आमदारकीला नशीब आजमावत आहेत. परंतु, त्यांना यश मिळत नाही. त्याच्यापुढे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे आव्हान असते. आता कडवी झुंज देणाऱ्या डॉ. भोसले यांना विकासकामांच्या माध्यमातून पाठबळ देण्यासाठी भाजप कमी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात या विकासकामांच्या जोरावर भाजप मतांची गोळाबेरीज करत असून त्यात त्यांना किती यश मिळेल हे निकालच सांगेल. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Atulbaba Bhosale
Devendra Fadnavis : धक्कादायक! फडणवीसांची बनावट सही, मेलच्या वापरातून बदली; गृहविभागाचा मोठा निर्णय

भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांना ताकद देण्याचे धोरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अवलंबिलेले कायमच दिसून आले आहे. गेल्याच आठवड्यात कराड दक्षिणमध्ये अतुलबाबा यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 131 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Atulbaba Bhosale
Baramati NCP Politics : बारामतीत राजकारणाचा नवा अंक; अजितदादांच्या नव्या-जुन्या शिलेदारांत वाद, काय आहे कारण?

यावेळी डॉ. भोसले यांनी कराड दक्षिणच्या विकासासाठी भविष्यातही भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत चव्हाण यांनी घेतली. त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत कराडमधील रस्त्यांसाठी 50 कोटींच्या निधीची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली होती. त्यास मंजूरी मिळाल्याचे अतुलबाबा भोसले यांनी सांगितले आहे.

नव्या रस्त्यावर कोणत्या सुविधा मिळणार  

केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत मंजूर झालेला हा राज्यातील निवडक रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. या रस्त्याला आता नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या 50 कोटींच्या निधीतून कराड शहरातील कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या 10 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

शिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे मॉर्निंग वॉक अथवा सायकलिंगसाठी सुरक्षित व स्वतंत्र मार्गाची सोय उपलब्ध होणार आहे. याशिवाय या रस्त्यावर अन्य अनुषंगिक सेवासुविधा जसे की, प्रसाधनगृह, स्वच्छतागृहे, पार्किंग स्लॉट, सायकल पार्किंग स्टॅन्ड अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Atulbaba Bhosale
Mahadev Jankar : महादेव जानकरांनी परभणीचा नाद सोडला? आता माढ्यासाठी जोर लावणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com