कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (KDCC Bank Election) भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत आघाडी केली होती. पण या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपल्याला फसवल्याची टीका भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. आमदार प्रकाश आवाडे आणि अशोक चराटी यांचा पराभव या फसवणुकीमुळे झाल्याचा आरोपही पाटील यांनी केल्याने निवडणुकीतील वाद वाढला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवलेले आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पाटील म्हणाले, दोन्ही काँग्रेसने (Congress) आमची फसवणूक केली आहे. ही त्यांची जुनी परंपरा आहे. पण हे पाप त्यांना याच जन्मात फेडावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.
प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ (Hasan Mushrif) आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधला. या निवडणुकीत भाजपची ताकद मर्यादित असल्याचे आम्हाला माहित होते. शिवसेनेकडून (Shiv Sena) आम्हाला फक्त एक जागा मिळणार होती. तर सत्ताधारी आघाडी तीन जागा देण्यात तयार होती. त्यामुळे आम्ही या आघाडीसोबत गेलो. या निवडणुकीत भाजपचे अमल महाडिक यांची निवड बिनविरोध झाली.
सहयोगी पक्षाचे दोघे जण निवडून आले. तर पतसंस्था, कृषी पणन गटातून दोन जण निवडून येथील याची खात्री होती. पण तिथेच फसवणूक झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केलं. फसवणूक करण्याची त्यांची जुनीच परंपरा आहे. योग्यवेळी त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. आवाडे यांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार अर्जुन आबिटकर यांनी केला आहे.
दरम्यान, पाटील यांनी गुरूवारी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. कोविडच्या नियमांबाबत सरकारमधील मंत्रीच एकमेकांना सहकार्य करत नाहीत. तुमच्या सततच्या निर्बंधांमुळे आत्महत्येचं सत्र आणखी वाढेल. नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगात नियमित सुरू आहेत, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, असे पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.