Prithviraj Chavan on Karnataka Election: राष्ट्रवादीमुळे भाजपला फायदा होणार? पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक वक्तव्य

Prithviraj Chavan News: येत्या १० मे रोजी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत
Prithviraj Chavan on Karnataka Election
Prithviraj Chavan on Karnataka ElectionSarkarnama

Prithviraj Chavan on Karnataka Elections 2023 : कर्नाटक हे देशातील महत्वाचे राज्य आहे. विकासात बेंगळूरचे योगदान आहे. भाजपच्या 40 टक्के कमिशनची पोलखोल झाल्यामुळे केंद्र व राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ आहे. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) 130 जागा मिळणारच, असा विश्‍वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केला. ते काँग्रेसभवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP will benefit from NCP? Indicative statement of Prithviraj Chavan)

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कर्नाटकातील (Karnatak Election 2023) भाजपचे विद्यमान मंत्री 40 टक्के कमिशन घेतल्याशिवाय कामं करत नाहीत. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या खाऊमध्येही घोटाळा सुरु आहे. त्यामुळे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. या कमिशनखोर लोकांना कंटाळून बेळगावातील एका अभियंत्याने आत्महत्या केली. आता जनतेनेच काँग्रेस सरकार आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे इतर पक्षातील दिग्गज नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे हे कमिशन घेऊन काम करणारे पुन्हा पैशाच्या टक्केवारीसाठीच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. कर्नाटकातील डबल इंजिन सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे.

Prithviraj Chavan on Karnataka Election
Karnatak Election 2023: कोलार विधानसभा मतदारसंघ एवढा महत्त्वाचा का? जाणून घ्या कारण

राष्ट्रवादी काँग्रेसने 40 उमेदवार कर्नाकटच्या आखाड्यात उतरवले आहेत. देशात भाजपविरुध्द 20 पक्षांची मोट बांधली आहे. यात राष्ट्रवादी तर आहेच. याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. पण कर्नाटक निवडणुकीत त्यांनी भूमिका वेगळी घेत स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे. यामुळे मतांची विभागणी होऊन भाजपच्या उमेदवारांना फायदा होण्याची भीती आहे, असे चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले.

‘केंद्रात आणि राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे.या डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळेल, असे वाटत होते. पण इथे तर डबल भ्रष्टाचार सुरु झाला. अदानी कंपनीत 20 हजार कोटी रुपयांची बेनामी गुंतवणूक, या सर्व मुद्द्यावरुन राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केल्याने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली. पण आता कर्नाटकात काँग्रेस चीच एकहाती येईल. काँग्रेसला 130 पेक्षा अधिक जागा पक्षाला मिळतील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com