Solapur News : भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनीच केली पक्षाची पोलखोल; म्हणाले, "वचननामा लोकांना..."

BJP vs Congress : भाजपचे दोन्ही खासदार बिनकामाचे असल्याचाही केला घणाघात
Nana Patole Welcomes Ashok Nimbargi
Nana Patole Welcomes Ashok NimbargiSarkarnama
Published on
Updated on

Solapur Politics : सोलापूर शहर काँग्रेसचा निर्धार मेळावा रविवारी (ता. २१) पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी सोलापूरमधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनीही सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरचे नेतृत्व करतील अशी ग्वाही दिली. सत्ता आल्यानंतर मात्र प्रणिती शिंदेंच्या रुपाने सोलापूरला झुकते माप देण्याचीही मागणी केली. त्यावर त्याची पूर्तत होईल, असे आश्वासनही पटोले यांनी यावेळी दिले.

Nana Patole Welcomes Ashok Nimbargi
Nana Patole Statement: नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका; म्हणाले...

भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये (Congress) जाहीर प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. आता भाजपची विचारधारा बदलल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. निंबर्गी म्हणाले, "आम्ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने प्रेरित होऊन भाजपमध्ये आलो.पण, आता तो विचार आम्हाला शोधूनही सापडत नाही. पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे अनेकजण वैतागले आहेत. त्यामळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे." (Latest Marathi News)

Nana Patole Welcomes Ashok Nimbargi
Nana Patole on Congress: आम्हाला 'यां'ना 2024 ला देशाचे पंतप्रधान करायचे आहे...; नाना पटोलेंनी थेट नावचं सांगितले...

यावेळी निंबर्गी यांनी भाजपचा वचननामा कसा तयार होतो, त्यामागची भूमीका काय असते, याची जाहीरपणे पोलखोल केली. निंबर्गी म्हणाले, "भाजपचा (BJP) वचननामा कसा तयार होतो, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. वचननाम्याच्या माध्यमातून भाजप नेहमीच लोकांना वेड्यात काढत आले आहे. कुणी चंद्र मागत असेल, तरी त्याला निवडणूक होईपर्यंत देतोच म्हणायचे. नाही हा शब्दच वापरायचा नाही. असा वचननामा आम्ही वरिष्ठांच्या सांगण्यावरून तयार करायचो."

Nana Patole Welcomes Ashok Nimbargi
BJP News: नड्डांच्या राज्य दौऱ्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नेमण्याची डेडलाईन हुकली; इच्छुक धास्तावले

निंबर्गी यांनी भाजपचे दोन्ही खासदार बिनकामाचेच असल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, "२०१४च्या लोकसभा निवडणुकीतून ॲड. शरद बनसोडे खासदार झाले. ते हातात मोठमोठ्या अंगठ्या घालून लोकसभेत जात होते. सर्वात मागच्या बाकावर निवांत बसत होते. आताचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी (Jaysiddheshwar Mahaswami) यांना पोलीस ठाण्याला हजेरी द्यावी लागत आहे. याचा परिणाम सोलापूरातील विकासकामांवर झाला आहे. आता मात्र सोलापूरकरांनी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना साथ द्यावी. त्यामुळे सोलापूरचा विकासाचा 'बॅकलॉग' निश्चितपणे भरून निघेल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com