गोविंद साळुंके
अहमदनगर - संगमनेर शहरातील ऐतिहासिक हनुमान जयंती रथ उत्सवात यंदा रश ओढण्याचा मान केंद्रीय मंत्री भारती पवार ( Barti Pawar ) व भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांना मिळाला. संगमनेर शहरात ब्रह्मचारी हनुमानाचा रथोत्सवात महिलांना विशेष मान असतो. याची हकीकत ऐतिहासिक व रोमांचकारी आहे. ( Brahmachari Hanuman's chariot was pulled by Bharti Pawar and Chitra Wagh ... )
संगमनेरच्या ऐतिहासिक रथ उत्सवात केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, भाजप नेत्या चित्रा वाघ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी हनुमान रथ ओढला. हनुमान ब्रह्मचारी असल्याने त्याच्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश निषिद्ध मानला जातो मात्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्यासाठी मान असतो तो फक्त महिलांनाच. ही परंपरा ब्रिटिश काळापासून आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संगमनेर येथील हनुमान जयंती सोहळ्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, पोलिस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या. सर्व महिलांनी परंपरेप्रमाणे हनुमान विजय रथ ओढून मिरवणुकीचा प्रारंभ केला. या प्रसंगी महिला नेत्यांनी झांज व ढोलही वाजविला.
कशामुळे निर्माण झाली ही परंपरा...
1929 मध्ये सरकारने हनुमान जयंती वर बंदी घालत गावातील तरुणांना अटक केली. रथ ओढण्यासाठी पुरुष नसल्याने पहिल्यांदाच परंपरा झुगारत महिलांनी हा रथ ओढला होता. तेव्हापासून संगमनेरकर महिला ही परंपरा जोपासत आहेत. विशेष म्हणजे पोलिस प्रशासनाकडून सुरवातीला या रथाची पूजा करण्यात येते.
हनुमान जयंतीच्या दिवशी संगमनेरच्या मुख्य रस्त्यावरून रथाची मिरवणूक निघते विशेष म्हणजे हा रथ ओढण्याचा मान महिलांचाच असतो याची सुरवात झाली एक ऐतिहासिक घटनेनंतर स्वातंत्र पूर्व काळात 1927 साली ब्रिटिशांनी संगमनेर मधील हनुमान जयंतीच्या उत्सवावर बंदी घातली सलग दोन वर्ष ही बंदी कायम होती 1929 साली उत्सव साजरा करायचाच निर्धार ग्रामस्थांनी केला काहीही झाले तरी उत्सव होऊ देणार नाही असे ब्रिटिशांचे धोरण होते. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी 22 एप्रिल 1929 रोजी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी मिरवणुकीवर बंदी घालण्याचे जाहीर केले संगमनेरला छावणीचे स्वरूप आले होते.
पाचशे पोलिस गावात तैनात करण्यात आले. हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटेच मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला मंदिरात हनुमान जन्माचा सोहळा झाल्यानंतर मिरवणुकीची तयारी झाली पोलिसांनी पुरुषांना अटक केली. संगमनेर मधल्या घराघरातल्या महिला पुढे आल्या आणि त्यांनी पुढाकार घेत रथामध्ये हनुमानाची मूर्ती ठेवली दोनशे-तीनशे महिलांची संख्या पाहता पाहता पाचशे-सहाशे झाली आणि या महिलांनी हनुमानचा रथ ओढायला सुरवात केली.
या नारी शक्तिमुळे ब्रिटीश आणि पोलिसांचे काही चालले नाही पोलिस काही करण्याआधी महिलांनी रथ ओढत ओढत गावाच्या मुख्य रस्त्यावर नेला. पोलिसांनी मिरवणुकीला मोटारी आडव्या लावत मिरवणूक रोखली पाचशे ते सहाशे महिलांनी एकत्र येत गाड्यांची तोडफोड केली. अडवणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यात गुलाल फेकला आणि ही मिरवणूक यशस्वी करून दाखवली. तेव्हापासून आजपर्यंत याउत्सवात हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.