रोहित पवारांच्या मतदारसंघात बैलगाडे सुसाट : प्राजक्त तनपुरे म्हणाले...

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या संकल्पनेतून कर्जत तालुक्यात महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा घेण्यात आली.
Bullock carts
Bullock cartsSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या संकल्पनेतून कर्जत तालुक्यात महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा घेण्यात आली. या बैलगाडी शर्यत पाहून राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विकासाचे व्हिजन रोहित पवारांत दिसते असे गौरोद्गार काढले. ( Bullock carts in Rohit Pawar's constituency: Prajakt Tanpure said ... )

या स्पर्धेची तयारी सुमारे 15 दिवसांपासून सुरू होती. आज मोठ्या उत्साहात ही स्पर्धा झाली. परिसरातील अनेक शेतकरी व बैलगाडा शर्यतीचे शौकीन ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. या स्पर्धेला क्रीडा विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, साईबाबा देवस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, शिवेंद्रराजे भोसले, राजेंद्र पवार, घनश्याम शेलार, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Bullock carts
रोहित पवारांचे पडळकरांना सडेतोड उत्तर : म्हणाले...

या प्रसंगी प्राजक्त तनपुरे म्हणाले, रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी अंगावर थरार व काटा येईल अशा बैलगाडा शर्यतीचे यशस्वी आयोजन केले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यावर या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. हा महाराष्ट्रातील शर्यतीचा अद्भूत थरार होता. आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. आम्ही ऐकले होते की रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे रुप पालटले आहे. मी इथे येण्याआधी शहरात चक्कर मारून आलो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विकासाचे व्हिजन रोहित पवार यांच्यात दिसते. भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्त्व करण्याची त्यांची क्षमता आहे. शरद पवार सर्वसमावेशक विकास करतात. यात कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, औद्योगिक, कृषी आदी क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्याच पद्धतीने मतदार संघात विकास करताना रोहित पवार दिसत आहेत. त्यामुळे आम्हाला रोहित पवार यांच्यात शरद पवारांची झलक दिसते, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com