नगर महापालिकेच्या कचराडेपोला बुरूडगावकरांनी ठोकले टाळे

अहमदनगर महापालिकेचा कचरा डेपो बुरुडगाव (ता. नगर) येथे आहे.
closed Ahmednagar Municipal Corporation's garbage depot
closed Ahmednagar Municipal Corporation's garbage depotSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर महापालिकेचा कचरा डेपो बुरुडगाव (ता. नगर) येथे आहे. आज दुपारी बुरूडगावमधील ज्येष्ठ नेते बापूसाहेब कुलट यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांनी महापालिकेच्या कचरा डेपोला टाळे ठोकले. त्यामुळे अहमदनगर शहरात कचरा संकलन व विघटनाचा मोठा प्रश्न महापालिकेसमोर उभा ठाकला आहे. ( Burudgaon residents closed Ahmednagar Municipal Corporation's garbage depot )

2019 मध्ये अहमदनगर महापालिकेत बाबासाहेब वाकळे महापौर असताना महासभेत सावेडी कचरा डेपो बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे अहमदनगर शहरातील सर्व कचरा बुरूडगाव येथील कचरा डेपोत येणार हे स्पष्ट झाले होते. बुरूडगाव येथील कचरा डेपोला काही ग्रामस्थांचा विरोध होता. मात्र महापालिकेने बुरूडगावला पाणी, पथदिवे व रस्ते देण्याचे मान्य केल्याने बुरूडगावमधील सत्ताधारी व नागरिकांनी बुरूडगावमधील कचरा डेपोच्या विस्ताराला मान्यता दिली होती.

closed Ahmednagar Municipal Corporation's garbage depot
नगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाने प्रशासनासमोर वाढविला पेच

अडीच वर्षे होऊनही महापालिकेने बुरूडगाव येथे पाणी, पथदिवे व रस्ते यापैकी कोणतीही सुविधा दिली नाही. मात्र बुरूडगाव कचरा डेपोमध्ये नवीन प्रकल्प आणत कचरा डेपोचा विस्तार केला. या कचराडेपोचा नागरिकांना त्रास होत आहे. शिवाय महापालिकेच्या घनकचरा विभागाची वाहने जे-जा करत असल्याने बुरुडगावमधील रस्ते खराब झाले आहेत. महापालिकेने रस्त्यावर केवळ माती टाकली आहे. या रस्त्यासाठी दोन लाख रुपये खर्च केल्याचे महापालिकेकडून बुरुडगाव ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यामुळे बुरूडगाव ग्रामस्थांचा पारा चढला.

बुरूडगाव ग्रामस्थांनी 21 फेब्रुवारीला महापालिकेला स्मरणपत्र देत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र महापालिकेकडून त्याला कोणतेही उत्तर आले नाही. काल ( सोमवारी ) रात्री बापूसाहेब कुलट यांना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांचा फोन आला. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सरपंच व ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत जोपर्यंत बुरूडगावला पाणी, पथदिवे व रस्ते मिळत नाहीत. तोपर्यंत कचरा डेपो बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

closed Ahmednagar Municipal Corporation's garbage depot
शिवाजी कर्डिले म्हणाले, राम शिंदेंना विधान परिषदेचे आमदार करा...

बापूसाहेब कुलट यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी उपसरपंच शिराज शेख, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाचारणे, राजू क्षेत्रे, जालिंदर वाघ, महेश निमसे, विजय कदम, संजय फुलारे, संभाजी जाधव, पांडू जाधव, किशोर कर्डिले, अक्षय चव्हाण, नितीन जाधव, संभाजी शिंदे, उमेश कुलट, मोहन काळे, संकेत तार्डे आदी ग्रामस्थ महापालिकेच्या कचरा डेपोवर गेले. त्यांनी कचरा डेपोची प्रवेशद्वारे बंद करत टाळे ठोकले. तसेच महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली.

कचरा डेपोला कुलूप लागताच महापालिका आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांचा कुलट यांना फोन आला. त्यांनी रस्ते, पाणी, पथदिवे देण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्ते ठाम होते. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. शंकर शेडाळे व रोहिदास सातपुते हे तीन अधिकारी कचराडेपोवर आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढे दिवस महापालिकेने काही केले नाही, आता काय करणार असा उलट प्रश्न करत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. ग्रामस्थांनी महापालिका अधिकाऱ्यांना महापालिकेने रस्त्यावर टाकलेली माती दाखविली. दोन लाखात महापालिकेने रस्त्यावर माती टाकत रस्ता झाल्याचे दाखविल्याचा आरोपही बापूसाहेब कुलट यांनी केला. महापालिका अधिकाऱ्यांनी उद्या (बुधवारी) ग्रामस्थांना महापालिका आयुक्तांच्या दालनात चर्चेसाठी बोलावले मात्र ग्रामस्थांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अहमदनगर शहरात कचरा कोंडीची स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

closed Ahmednagar Municipal Corporation's garbage depot
कर्डिले-गाडे राजकीय संघर्षाचे वाजू लागले नगारे

आम्ही कचरा डेपोला मान्यता देताना अटीशर्ती घातल्या होत्या. यात बुरूडगावसाठी रस्ता, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावू, पाणी व पथदिव्यांची मागणी केली होती. त्या अटीशर्ती महापालिकेने मान्य केल्या मात्र 50 टन प्रतिदिन असलेले कचरा संकलन 150 टन प्रतिदिनवर नेले. अटीशर्तीतील कोणतीही गोष्ट महापालिकेने बुरूडगावमध्ये दिलेली नाही. त्यामुळे आम्ही आज महापालिकेच्या कचरा डेपोलाच टाळे ठोकले आहे.

- बापूसाहेब कुलट, ज्येष्ठ नेते, बुरूडगाव.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com