Shrikant Deshmukh
Shrikant DeshmukhSarkarnama

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांवर पुण्यात गुन्हा दाखल

श्रीकांत देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे : एका महिलेसोबतचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा द्यावे लागलेले सोलापूर (Solapur) भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्यावर पुण्यातील (Pune) डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पुण्यात गुन्हा दाखल करून तो सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली. (Case registered in Pune against former Solapur district president of BJP Shrikant Deshmukh)

Shrikant Deshmukh
शिवसेनेला पुण्यात आणखी एक धक्का : जिल्हाप्रमुख कोंडे मुख्यमंत्री शिंदे गटात

माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहे. देशमुख हे अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेले आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हे वाक्य ऐकताच देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित देशमुख यांनी त्या महिलेवर हनीट्रॅपच्या आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या नंतर देशमुख यांनी भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Shrikant Deshmukh
राष्ट्रवादीला लवकरच मोठा धक्का?; नाराज राजन पाटलांसाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावली!

हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. श्रीकांत देशमुख आणि पीडित महिला यांचं कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याचीही चर्चा संपूर्ण राज्यभरात झाली होती. संबंधित पीडित महिलेने याबाबतची तक्रार पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार देशमुख यांच्यावर कलम 3७६, 3७७, ५०४, ५०६ यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गुन्हा दाखल करून तो सोलापूरला वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली आहे.

पीडित महिलेची महिला आयोगात धाव

दरम्यान, संबंधित महिलेने श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर पडायला भीती वाटत आहे, असे म्हणत मेलद्वारे महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या मेलमध्ये, महिला आयोगाने माझ्यासहीनिशीची तक्रार दखल पात्र गुन्हा म्हणून नोंद करण्याबाबत संबंधित पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावेत वा माझी तक्रार नोंदवण्यासाठी मला मदत करावी, असे म्हटले आहे. देशमुख हे आर्थिक व राजकीयदृष्ट्या बलाढ्य असल्यामुळे मला भीतीपोटी बाहेर जाऊन फिर्याद देणे शक्य न झाल्याने ही फिर्याद इमेलद्वारे दाखल करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com