Gokul Dudh Sangh : शौमिका महाडिकांच्या रजाच जास्त; गोकुळच्या अध्यक्षांनी हिशोबच केला

Arun Dongle Vs Shoumika Mahadik : "सतेज पाटलांचा सभेशी काहीही संबंध नाही"
Arun Dongle, Shoumika Mahadik
Arun Dongle, Shoumika MahadikSarkarnama

Kolhapur Political News : गोकुळची सभा यशस्वी झाली असून संचालक मंडळाने सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कुणाचाही आवाज दाबत नाही. आजची सभा ही सभासदांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी असते, यावेळी संचलकांनी बोर्डात प्रश्न विचारायचे असतात. शौमिका महाडिक गेल्या अडिच वर्षांपासून संचालक मंडळावर आहेत. मात्र त्यांच्या रजाच जास्त आहेत. आमच्याकडे तशी नोंद आहे, असे सांगत गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडिकांवर पलटवार केला आहे. (Latest Political News)

गोकुळची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली असून यावेळी मोठा गोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. खरे सभासद बाहेर दोन किलोमीटरच्या रांगेत असताना बोगस मंडळी सभेला बसल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिकांनी (Shiumika Mahadik) केला. तसेच वारंवार विचारून, लेखी देऊनही सभासदांच्या वतीने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळच्या दूध संकलनात घट होत असून जिल्ह्यात अमूलचे प्रस्थ वाढत आहे. गोकुळचे सत्ताधारी माजी मंत्री सतेज पाटील आणि कारभाऱ्यांमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरे देणे का टाळत आहेत, हेच कळत नसल्याचा हल्लाबोल महाडिकांनी केला.

Arun Dongle, Shoumika Mahadik
Gokul Dudh Sangh : सतेज पाटलांमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत नाही; शौमिका महाडिकांचा घणाघात

महाडिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे म्हणाले, 'शेतकऱ्यांचे आणि त्यांनी दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रस्ताविकात दिलेली आहेत. आजचा दिवस हा फक्त सभासदांनी प्रश्न विचारण्याचा असतो. त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. संचलकांनी बोर्डात प्रश्न उपस्थित करायचे असतात. मात्र अडीच वर्षे संचालक असलेल्या शौमिका महाडिक निम्म्याहून अधिक वेळा बोर्डात गैरहजर राहिल्या आहेत. उपस्थित, अनुपस्थितांचे सर्व रेकॉर्ड आमच्याकडे आहे.'

आजच्या सभेचा आणि सतेज पाटलांचा काहीही संबंध नसल्याचे सांगून डोंगळे यांनी आरोपांचे खंडन करत महाडिकांचा समाचार घेतला. 'महाडिकांना कावीळ झाल्याने सर्व पिवळेच दिसत आहे. त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. यावर त्यांनी उपचार करून घ्यावेत. अमूल दूध या प्रतिस्पर्धीला कसे रोखायचे ते आम्ही पाहतो. मात्र त्यांनी अमूलला वाढण्यासाठी हातभार लावू नये. सभेला सर्व गोकूळचेच सभासद उपस्थित होते. तीस वर्षांची सत्ता गेल्याने त्यांना दुःख झाले आहे,' असा पलटवार डोंगळेंनी शौमिका महाडिकांवर केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Arun Dongle, Shoumika Mahadik
Aaditya Thackeray's Question : भूलथापा, खोट्या घोषणांच्या पलीकडे..; शेतकऱ्यांच्या बांधावरुन आदित्य ठाकरेंनी फटकारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com