पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न : चंद्रकांतदादांचा आरोप

Kolhapur | Chandrakant Patil | ED : १ हजाराच्या महोपायी नागरिकांनी ईडी चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावून घेवू नये
chandrakant patil
chandrakant patilsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम लागला आहे. शिवसेनेचे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), भावना गवळी (Bhawana Gawali), अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा नेत्यांच्या मागे ईडी (ED), सीबीआय (CBI), आयकर या यंत्रणांच्या चौकशीचे, छाप्यांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. या छाप्याच्या मागे भाजपचा (BJP) हात असल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीकडून होत असतो. भाजपचे नेते देखील या कारवाईचे भ्रष्टाचार निर्मूलन सुरु असल्याचे सांगत समर्थन करत असतात.

मात्र आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमध्ये पैसे घेणाऱ्या जनतेच्याही ईडी चौकशी लागू शकते असा इशारा दिला आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले असून या प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आज पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या मतदारांना पैसे वाटण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप केला. सोबतच हे पैसे घेतलेल्या मतदारामागे ईडीची चौकशी लागेल असा इशाराच दिला.

chandrakant patil
मोठी बातमी : राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे ED च्या रडारवर, 'मविआ'चा आणखी एक अडकणार?

चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वी एक हिंट दिली होती की, एका शिक्षण संस्थेचे तरुण-तरुणी मागील काही दिवसांपासून घरोघरी फिरुन एक फॉर्म भरुन घेत आहेत. यात नाव, वय, फोन नंबर, बँक अकाऊंट नंबर अशी सगळी माहिती घेतली जात आहे. निवडणूक काळात हे काम कोणी दिले याची चौकशी करुन आयोगाने त्यांच्या कारवाई करायला हवी. या तरुण-तरुणींना तर ऑफर पण आहे की चांगला डाटा गोळा केला तर इंटरनल मार्क्स वगैरे चांगले मिळतील.

chandrakant patil
"लाव रे तो व्हिडीओ" : राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे 'मनसे' स्टाईल उत्तर

पण आता माझी पक्की माहिती आहे की, निवडणुकीच्या आधी पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाची ही पूर्व तयारी सुरु आहे. पण मी नागरिकांना सावध करु इच्छितो की, चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे १००० रुपये प्रतिमाणूस तुमच्या अकाऊंटला येण्याची सुद्धा ईडी चौकशी होईल. हे पैसे आले कुठून, आणि हे पैसे ज्याने पाठवले त्याने आणले कुठून.

यासाठी आजच मी ईडीला पत्र लिहित असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. स्वतःचा बॅल्क मनी पेटीमच्या माध्यमातून मतदारांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. सोबतच १ हजार रुपयांच्या महोपायी नागरिकांनीही ईडी चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावून घेवू नये असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com