मोठी बातमी : राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे ED च्या रडारवर, 'मविआ'चा आणखी एक अडकणार?

NCP | Babanrao Shinde : मागील २ महिन्यात ३ वेळा चौकशी झाली असल्याची माहिती
Babanrao Shinde
Babanrao ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

सोलापूर : महाविकास आघाडीच्या नेत्यांमागील केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. आमदार शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे जे जिल्हा दूध संघाचे चेअरमन देखील आहेत, त्यांची ईडीकडून चौकशी झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती आहे.

याबाबत आमदार शिंदे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र बबनराव शिंदे यांना ईडीने बजावलेल्या दोन समन्सचे फोटो माध्यमांच्या हाती सापडले आहेत. त्यामुळे मागील ३ महिन्यांपासून ही चौकशी सुरु असण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे संपूर्ण प्रकरण ५०० कोटींच्या घरात जात असल्याचीही माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gokul Mahayuti Meeting Devendra Fadnavis
Devendra Kothe-Chetan Narote
Gokul Dudh Sangh | Hasan Mushrif Vs Satej Patil
Udaysinh Patil Undalkar-Shambhuraj Desai