सातारा : ''आमच्या जीवावर अठरा खासदार निवडुन आनलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. संजय राऊत (MP Sanjay Raut) तर आता उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील, अशा गर्जना करत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) तर नेहमीच पंतप्रधान होत असतात,'' अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फलटण येथील कार्यक्रमात केली.
फलटण तालुका आणि शहराच्या भाजपच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, अनुप शहा आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडुन आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं, गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत. संजय राऊत तर त्यांना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊत म्हणाले, ''चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे विधान गंभीरपणे घेऊ नये. ते नैराश्यातून अशी विधानं करीत असतात. त्यांची प्रकृती नीट राहावी, म्हणून मी त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही. सध्या विरोधी पक्षांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती नीट राहावी, राज्यातील जनतेची प्रकृती नीट राहावी , म्हणून मी उत्तर देणार नाही,''
''महाराष्ट्रात कुणी कुणाला खाद्यांवर वाढवलं हे सर्वांना माहित आहे,'' असा टोमणा राऊतांनी भाजपला लगावला. ''महाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. सर्वपक्ष मिळून आणि किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर समन्वय साधत काम करत आहेत. महाराष्ट्रातील महाविका आघाडीचा प्रयोग हा 'मिनी यूपीए'चाच प्रयोग आहे,'' असे संजय राऊत यांनी मंगळवारी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.