मी घरी येणार होतो म्हणत चंद्रकांतदादांनी दिली ऋतुराज पाटलांना 'जादू की झप्पी'

Chandrakant Patil | Satej Patil | Ruturaj patil : प्रचार संपला, मतदान झाले
Chandrakant Patil | Satej Patil | Ruturaj patil
Chandrakant Patil | Satej Patil | Ruturaj patilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : 'कोल्हापूर उत्तर' (Kolhapur) विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) जयश्री पाटील (Jayshree Patil) रिंगणात आहेत, तर भाजपकडून (BJP) सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणूक असली तरीही दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे.

काँग्रेस राज्यात सत्ताधारी असल्याने ही जागा राखण्यास उत्सुक आहे. तर भाजप पंढरपूर-मंगळवेढ्याच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सध्या आजी माजी पालकमंत्री अर्थात मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Kolhapur north assembly by election News Updates)

Chandrakant Patil | Satej Patil | Ruturaj patil
आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; कोल्हापूरचे 'उत्तर' आज ठरणार...

अशातच आज कोल्हापुरकरांना एक भुवया उंचावणारे चित्र पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी आज कसबा-बावडा इथल्या बुथवर थांबून मतदारांचे स्वागत केले. त्यावेळी कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील मतदानासाठी आले. तेव्हा चंद्रकांत पाटील व ऋतुराज पाटील यांनी मतदान केंद्रावरच एकमेकांची गळाभेट घेतली. तसेच, ऋतुराज पाटील यांच्याकडूनच पालकमंत्री सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मी घरीच येणार होतो, पण तुम्ही बाहेर पडला असाल म्हणून आलो नसल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले.

Chandrakant Patil | Satej Patil | Ruturaj patil
Silver Oak Attack : हल्ल्याच्या दिवशी सदावर्तेंचा पत्रकाराबरोबर व्हिडिओ कॉल; खात्यात दीड कोटीही जमा

कसबा बावडा हा भाग कोल्हापूर उत्तरसाठी अत्यंत निर्णयाक मानला जातो. त्यामुळे कसबा बावडा मतदान केंद्रावरच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तळ ठोकून आहेत. या ठिकाणी मतदारांना हलगी व कैताळ वाजवतच मतदान केंद्रावर आणण्यात आले. त्यामुळे कसबा बावडा मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे. मतदारांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दरम्यान, चंद्रकांतदादा व ऋतराज पाटील यांच्यामधील खेळीमेळीच्या संवादाने कार्यकर्ते आश्‍चर्य चकित झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com