गावोगावी फिरुन मतदान मागितले; पण सत्ता मिळाल्यावर एकाही कार्यक्रमाला बोलावले नाही!

बिद्री साखर कारखान्याच्या सताधाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांचा इशारा
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

बिद्री (जि. कोल्हापूर) : बिद्री साखर कारखाना वाचावा आणि प्रशासनात चांगली माणसे निवडून यावीत, म्हणून मी गावोगावी फिरुन मतदान मागितले. परंतू सत्ता मिळाल्यानंतर सतारुढ गटाने आपल्याला एकाही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही, जरी दिले असते, तरीही मी गेलो नसतो. काही महिन्यानंतर बिद्री साखर कारखान्याची निवडणूक असून एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही, असा इशारा सताधाऱ्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला. (Chandrakant Patil's warning to the ruling party of Bidri sugar factory)

बिद्री (ता. कागल) येथील दूध साखर पतसंस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सतारुढ पॅनेलचा प्रमुख नेता असतानाही आपल्याला कार्यक्रमाला बोलाविले नसल्याची खदखद व्यक्त केली. या वेळी बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, भूषण पाटील उपस्थित होते.

Chandrakant Patil
जिल्हा दूध संघ निवडणूक : दिलीप माने, बळीराम साठे, आवताडेंच्या अर्जाचे काय होणार?

आमदार पाटील म्हणाले, सत्तेत चांगली माणसे वेगवेगळ्या पदावर जावीत, हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. बिद्रीतही तो करण्याचा प्रयत्न मी केला. परंतु सत्ता मिळाल्यानंतर बिद्री प्रशासनाने जाणीवपूर्वक भाजपला डावलण्याचा प्रयत्न केला. या वेळी वसंतराव पाटील, नाथाजी पाटील, लहू जरग, प्रताप पाटील, बाळासाहेब पाटील, सरपंच संगीता बोडके, एस.एम. पाटील, एम.एम.चौगले, के.डी.चौगले, अशोक फराकटे उपस्थित होते.

Chandrakant Patil
पुण्याचे बाजीराव गिरीश बापटच : बापट म्हणतात ‘...मग माझी मस्तानी कुठाय!’

खोटे कसे बोलायचे, हे दोन्ही काँग्रेसकडून शिकावे

भाजप सरकारच्या काळात कारखाना विस्तारीकरणाच्या परवानगीचे काम थांबविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर केला होता. परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कारखान्याने दिली नसल्यानेच त्यांना परवानगी मिळाली नव्हती. स्वतःच्या अपयशाचे खापर भाजपवर फोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे दोन्ही काँग्रेसकडून खोटे कसे बोलायचे ते शिकावे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com