Lok Sabha Election 2024 : मोदी लाटेपुढे पवारांची अवस्‍था केविलवाणी; बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bawankule vs Sharad Pawar : इंडिया आघाडीकडे तर पंतप्रधान पदाचा उमेदवारही नाही. मोदींनी देशाचा गौरव संपूर्ण विश्वात केला आहे. निवडणुकीनंतर शरद पवार गट शून्‍य होणार आहे
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule, Sharad PawarSarkarnama

Satara BJP News : खासदार शरद पवार यांची अवस्‍था पहिल्यांदा इतकी केविलवाणी झाली आहे. 45 वर्षे सत्ता असून, त्यांना बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. सध्या मोदींची सुप्त लाट असून, ही लाट त्सुनामीसारखी आहे. या लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, शशिकांत शिंदेंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, ते त्यांना मान्य नाहीत. यावरून पवारांनी त्यांना भ्रष्टाचार करण्याचे प्रमाणपत्र दिले आहे का? असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule शनिवारी (ता. 27) जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्‍या वेळी त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे म्हणाले, ‘‘मोदींची 2019 प्रमाणेच यावेळेसही सुप्त लाट आहे. ही लाट शरद पवारांच्या Sharad Pawar सर्व उमेदवारांना हरविल्याशिवाय राहणार नाही. देशाचे पंतप्रधान कोण हे साताऱ्यातील कोणत्याही व्यक्तीला विचारले तर मोदींचेच नाव येत आहे. इंडिया आघाडीकडे तर पंतप्रधान पदाचा उमेदवारही नाही. मोदींनी देशाचा गौरव संपूर्ण विश्वात केला आहे. निवडणुकीनंतर शरद पवार गट शून्‍य होणार आहे.’’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बावनकुळे म्‍हणाले, शशिकांत शिंदेंबाबत Shashikant Shinde पोलिसांना तक्रार मिळाली असून, त्यानुसारच गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यावर जनताही माफ करत नाही. निवडणुकीच्या काळातच नव्‍हे जेव्‍हाही तक्रार येते त्यानुसार कारवाई होते, असे म्हणत शशिकांत शिंदेंवर निशाणा साधाल.

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar
Prithviraj Chavan On Modi : आता मोदींना हरवाचंय हे लोकांचं ठरलंय; पृथ्वीराज चव्हाणांची जहरी टीका

माण, खटावच्या दुष्काळी भागासाठी मुख्‍यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेऊन पाणी पोचविण्यासाठी प्रयत्‍नशील आहेत. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना जे 40 वर्षांत जमले नाही ते आम्‍ही पाच वर्षांत केले. माढ्यात कोणी कितीही जोर लावला, तरी जनतेला मोदींच्‍या नावाला मतदान करायचे आहे. मोदींची Narendra Modi तुलना पुतीन यांच्‍याशी करण्‍यापेक्षा ‘कुठे मोदीजी, कुठे सूर्य, कुठे जयेद्रथ, हे पाहा, असा टोलाही बावनकुळेंनी महाविकास आघाडीला MVA लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar
Narendra Modi Satara : पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी; तीन हेलिपॅड, अडीच हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com