Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Narendra Modi Satara : पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी; तीन हेलिपॅड, अडीच हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

Satara Lok Sabha Election 2024 : सभास्थळी 80 बाय 40 आकाराच्या भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. त्या परिसरात 50 हजारवर लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

Satara Political News : लोकसभा निवडणुकीने देशातील राजकीय स्थिती ढवळून निघाली आहे. आता लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभांचा धडाकाच लावला आहे. ते सध्या राज्यात असून दोन दिवसांत सहा सभा घेणार आहेत. ते सोमवारी कऱ्हाडमध्ये सभा घेणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या सोमवारी (ता. 29) कऱ्हाड (जि.सातारा) येथे होणाऱ्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे सभास्थळानजीकच करण्यात आलेल्या हेलीपॅडवर उतरुन थेट सभास्थळी जाणार आहेत. दौऱ्यासाठी सात पोलिस अधिक्षक, 250 पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, दीड हजार पोलिस कर्मचारी आणि एक हजार होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन सैदापुर येथील कृषी विभागाच्या बीज गुणन केंद्राच्या जागेवर सोमवारी दुपारी एक वाजता करण्यात आले आहे. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभास्थळी 80 बाय 40 आकाराच्या भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. त्या परिसरात 50 हजारवर लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरे संपले; मग PM मोदींच्या सभांचा धडाका कशासाठी?

पालकमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी

जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई Shambhraj Desai यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळाची आज भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांच्या समवेत पाहणी केली. भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, सागर शिवदास, शिवसेनेचे जयवंत शेलार, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे, विकास गायकवाड,दिलीप जाधव, मोहनराव जाधव, मुरलीधर जाधव, शहाजी मोहिते आदि उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Narendra Modi
Sharad Pawar Satara : उदयनराजेंना खुन्नस; शरद पवारांनी दुसऱ्यांदा उडवली कॉलर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com