Maharashtra Swarajya Party: संभाजीराजेंच्या 'स्वराज्य' संघटनेला 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून मान्यता

SambhajiRaje Swaraj Association Recognized as Maharashtra Swarajya Party:आगामी विधानसभा निवडणुकीसाठी “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले असल्याची माहिती देखील संभाजीराजे यांनी दिली आहे.
Swaraj Association Recognized as Maharashtra Swarajya Party
Swaraj Association Recognized as Maharashtra Swarajya PartySarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या स्वराज संघटनेला आता अधिकृतपणे 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' या नावाने (Maharashtra Swarajya Party)मान्यता मिळाली आहे.

एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळाली असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या एक्स पोस्ट द्वारे जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले असल्याची माहिती देखील संभाजीराजे यांनी दिली आहे.

मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित ! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Swaraj Association Recognized as Maharashtra Swarajya Party
Actor Govinda: बंदुकीची गोळी लागल्याने शिवसेना नेता, अभिनेता गोविंदा जखमी

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर गंभीर आरोप केल आहेत. राजेशाही संपली असून लोकशाही आहे, असंही हाके यांनी म्हटलं आहे.

हे भेकड आहे. तुमच्यात धमक असेल, तर आडवे या... पळून कशाला गेला, असं 'चॅलेजं'ही हाके यांनी मराठा आंदोलकांना दिलं आहे. हाके यांच्या दाव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com